अन् दही हंडीत नियमांची घागर उताणी झाली


नागेश भोईर या तरुणासंबधी एक लेख दहहंडीच्या दिवशी सोशल मीडियावर फिरत होता. भिवंडीतला २७ वर्षाचा हा तरुण गेल्या सात वर्षापासून बेडवर आहे. कारण २००९ ला दहीहंडीचा सहावा मजला चढताना तो खाली पडला. त्याला पैरालिसिस झालाय. मानेखालून नागेशचं शरीर अजुनही कोणतंच प्रतिसाद देत नाही. तो बेडवरच पडलेला असतो. आई आणि त्याचे मित्र नागेशच्या सेवेत सतत हजर असतात.. राज्यभरात असे कितीतरी नागेश आहेत जे दहीहंडीच्या थरारासाठी कायमचं शारिरीक अपंगत्व घेऊन बसले आहेत. दहहंडीच्या थरांवर मर्यादा ठेवण्याठी नवी मुंबईच्या स्वाती पाटील यांनी कोर्टात याचिका दाखल केली आणि कोर्टानं ऐतिहासिक निकाल देत थरांच्या मर्यादा घालून दिल्या. तसंच नियमांचं भंग करणाऱ्यांवर कारवाईचा बडगादेखील ठेवला. मात्र दहीहंडी मंडळानं कोर्टाच्या आदेशाला पायदळी तुडवलं, आणि आठ ते नऊ थर लावून सलामी दिलीच.

थरारक सलामीनं एकट्या मुंबईतून १२६ गोविंदा कोसळून जखमी झाले. तर प्रतिक नावाच्या एका पंधरा वर्षीय मुलाचं मांडीचं हाड तुटलंय. सध्या प्रतिकवर सायनच्या टिळक हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाला पायदळी तुडवत दहीहंडीच्या थरांची स्पर्धा केली गेली. 'आम्ही कायदा मोडणारच!' अशी शपथ घेत गोविंदांना उंच-उंच चढवलं गेलं. या ग्लैमराईज दहीहंडीचं लाईव्ह प्रक्षेपण सर्वांनीच पाहिलंय. कोर्टाच्या आदेशानंतर दहीहंडीच्या 'राजकीय' आयोजकांनी तडकाफडकी पीसी घेतल्या. कोर्टाची धिंडवडे काढत शब्दफेक केली. तसंच आदेश धुडकावून लावत कोर्टाला चैंलेंजही केलं. नियमं मोडण्याची जाहीर आव्हानं करत दहीहंडी साजरी केली. राज्यभरात काय तर देशभरात दहीहंडी सणाचा उत्साह सुरु होता. मात्र माध्यमांनी फक्त मुंबई आणि पुण्याची मंडळंच दर्शकांना दाखवली. तर दुसरीकडे राज्यासह मुंबईतही गोविंदामध्ये थरं कमी केल्याची नाराजी दिसली. काही ठिकाणी स्टुलवरुन, शिडी लावत तर काही ठिकाणी दहीहंडीची प्रतिकात्मक चित्रे काढत नाराजी दर्शवली गेली. तर कोल्हापूर, सांगली जिल्हातली अनेक मानाच्या मंडळानं कोर्टाचा आदेशाचं पालन करत दहीहंडी उत्सव रद्द केले.

मुंबई आणि पुण्यात कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन होत असल्याचं निदर्शनास आलं. अनेक ठिकाणी ४० ते ५० फुटापर्यंत थरं लावली जात होती. तसंच हंडीच्या सलामीसाठी लहान मुलांचादेखील वापर करण्यात येत होता. ठिकठिकाणी थरांच्या कसरतींची स्पर्धा सुरु होत्या. दिवसभर गोविंदा कोसळून जखमी होण्याचे प्रमाण वाढत होते. रात्री उशीरापर्यंत मुंबईत २१ तर पुण्यात २५ मंडळांवर सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. आता सरकार या आयोजकांवर कोणती कारवाई करेल, हे येत्या काळात कळेलंच.

मुंबई ठाण्यात अनेक ठिकाणी दहा-पंधरा फुटावर हंडी बांधली होती. यातून कोर्टाच्या आदेशाचं नियमन करण्याचा हेतू नव्हता तर, कायद्यातून पायवाट काढण्याचं कामं सुरु होती. नियम तोडण्यासाठी मंडळांनी चालाखी केली होती. हंडी जरी पंधरा फुटावर बांधली असली तरी सलामीसाठी मात्र ३० ते ४० फुटी क्रेन लावलेल्या होत्या. सलामीच्या कसरती संपवून पंधरा फुटावर येऊन हंडी फोडली जात होती (?)  कायद्याच्या कचाट्यातून सुटण्याठी मंडळाची शक्कल मात्र तरण्या गोविंदाना आनंद देऊन जात होती. तर पोलीसं मात्र या चालाखीला कोणता कायदा लावायचा याचीच जुळवाजुळव करताना दिसली. तसंच कायद्यासोबत नियमांची फुलपट्टी यंत्रणेनं दिली नसल्याचंही अनेक पोलिसांनी सांगतलं. सक्त कारवाईचे आदेश पोलिसांनी दिले आहेत. बघुया किती आयोजक गोविंदाच्या खटल्याची तारखांना जातात. सरकारच्या अनेक कैमेऱ्यांनी थरार टिपली. लवकरच सरकारकडून कोणत्या मडळानं नियमं मोडली याची तपासणी होईल.

दहीकाला मंडळाची चालाखीनं दिवसाअखेर १२६ गोविंदाना हॉस्पिटलला पोहचवलं होतं. ही आकडेवारी फक्त मुंबईची आहे. राज्यभरातले आकडे सर्वांनी चहासोबत चाळलीय. दोन दिवसांपूर्वी एका वृत्तवाहिनीला नागेश भोईरची छोटीशी मुलाखत दाखवली गेली. यात नागेश भोईर सांगतोय, "बाबा रे थरांची उंची वाढवू नका! वाढलेल्या उंचाची शिक्षा मी भोगतोय. पण तुम्ही शाबूत रहावं यासाठी मी तुम्हास कळकळीची विनंती करतोय, थरांची उंची वाढवू नका रे बाबांनो" नागेशची ही मुलाखत बुधवारी दिवसभर चैनलवर सुरु होती. तरीही माझ्या कॉलनीतल्या मित्रांनी रात्री बाराला दुसऱ्या मजल्यावर हंडीची दोरी खेचलीच.. नागेश जीव राढून ओरडत होता स्टंटबाजी करु नका, पण ऐकतील ते तरुण कुठले.. नागेश सारखाच पंधरा वर्षाचा प्रतिक हंडी फोडताना पडला. डॉक्टर सांगतात की त्याच्या मांडीचं हाड मोडलंय. नागेश सारखंच आयोजकाऐवजी त्याच्या मित्रानं प्रतिकला हॉस्पिटलला दाखल केलंय. बघुया किती आयोजक प्रतिकला आर्थिक आणि मानसिक आधार देतात.

भारताची संस्कृतीक परंपरा ही जगभरात कौतुकाचा आणि चर्चेचा विषय. मात्र इथल्या भांडवलवादी जमातीनं सण उत्सवांना नफ्यांशी जोडलं, तशा आमच्या पारंपारिक उत्सव साजरा करण्याच्या पद्धती बदलल्या. त्यामुळेच आज मंगळागौरपासून वटपोर्णिमा ग्लैमराईज झाल्या.  या ग्लैमरतेचं आधुनिक आणि जिवघेणी स्टंट आपण न्यूजपेपरमधून वाचत असतोच. साडेतीन टक्क्यांच्या संस्कृतीनं उर्वरीत सर्वांवर गारुड करत उत्सवं मेनस्ट्रीम केली. प्रायोजक नावाच्या यंत्रणेनं सणांचा पारंपारिक उत्साह काढून घेतला. अलिकडे तर सोशल मीडियातून संकष्टीपासून ते इदेमिलादच्या शुभेच्छांचा वर्षाव सुरु झालाय. आत्ता तर पुण्यतिथी आणि मुहर्रमच्या शुभेच्छा पण सोशल मीडियानं फॉरवर्ड करायला भाग पाडलंय. या सर्वांमधून शुद्ध नफा कमवणारी छुपी मंडळी तुमच्या खाजगी आयुष्यात 'पोक' करु लागली. मग काय खिशाची पर्वा न करता उत्सवं धार्मिकतेपासून ग्लैमरतेकडे वळायला लागली. मग दहीहंडी काय आन् गणेश चतुर्थी काय सगळं सारखंच. येत्या काळात तर रमजान ईदची नमाज डीजेच्या तालावर अदा केली जाऊ शकते. याबद्दल सध्यातरी मानसिक तयारी करायला हरकत नसावी. बाकी आजचं उत्सवाचं स्वरुप पाहता सण उत्सवावर खूप काही भाष्य करायला संधी देत नाही. पण पारंपारिक उत्सवांना मिळालेला ग्लैमरचा तडका सामान्यांची खिसे कापून भांडवलवाद्यांची बँक बैलन्स वाढवतो. यावर विचार न करण्याइतके आपण दुधखुळे नाही आहोत.

राहीला प्रश्न सांस्कृतिक अवकाश शोधायचा तर तो पारंपारिक पद्धतीनंदेखील जपता येऊ शकतो. यात जरी बदल करावासा वाटत असेल तर जगात अनेक सामाजिक प्रश्न आहेत. जे हजारो वर्षापासून सुटकेची आस धरुन आहेत. हजारो वर्ष उलटूनही ही प्रश्ने अजुनही सुटलेली नाहीयेत. या प्रश्नांत सण-उत्सवांचे सांस्कृतिक अवकाश आणि अभिव्यक्ती शोधली जाऊ शकते. उत्सवांना राष्ट्रीय विषयाशी जोडून त्यांना ग्लोबल केला जाऊ शकतो. यातून सण-उत्सवांच्या सुटलेल्या मुळ उद्देशाकडे जाता येईल. मात्र सण-उत्सवांच उदात्तीकरण
टीकेशिवाय हाताला काहीच लागू देणार नाही. हेदेखील लक्षात घेतले पाहिजे.

कलीम अजीम, मुंबई

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,49,इस्लाम,38,किताब,24,जगभर,129,पत्रव्यवहार,4,राजनीति,297,व्यक्ती,21,संकलन,61,समाज,258,साहित्य,77,सिनेमा,22,हिंदी,53,
ltr
item
नजरिया: अन् दही हंडीत नियमांची घागर उताणी झाली
अन् दही हंडीत नियमांची घागर उताणी झाली
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiEa1L7S0eSd0nJII8bvJXk_SJXqZN0h4uw-DaBKo_jRFSw4K0HLNUMi0yc8sTRnPawpH7vrPk7-_R3xawt6hzaPFX82p4tgMPd2UqSLw9ayMK8yhgUT-vAvb_Gm_vm65YoMJBdpTLUIkx3/s640/IMG-20160825-WA0001.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiEa1L7S0eSd0nJII8bvJXk_SJXqZN0h4uw-DaBKo_jRFSw4K0HLNUMi0yc8sTRnPawpH7vrPk7-_R3xawt6hzaPFX82p4tgMPd2UqSLw9ayMK8yhgUT-vAvb_Gm_vm65YoMJBdpTLUIkx3/s72-c/IMG-20160825-WA0001.jpg
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2016/08/blog-post_26.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2016/08/blog-post_26.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content