
पुणे, ता: 16 (कलीम अजीम) गोविंद पानसरेवर हा हल्ला झाला नसून महाराष्ट्राच्या विवेकवर हल्ला आहे, या हल्ल्यातून पुन्हा एकदा धर्मवादी शक्तीने आपल्या विकृत मनोवृत्तीचे दर्शन दिले आहे. यानिमीत्ताने देशात कायदा व सुव्यवस्थेचे राज्य आहे का, हा प्रश्न परत एकदा उपस्थित झाला आहे. सांस्कृतिक महाराष्ट्रात अशा भ्याड घटना घडत आहेत मग सरकारकडून सुरक्षिततेसंदर्भात कायअपेक्षा ठेवाव्यात. देशात नथुराम सेना वाढत असल्यामुळे देशाच्या अखंडतेला धोका निर्माण होत आहे. प्रतिगामी व धर्मांध संघटनेला नव्या सरकारच्या स्थापनेमुळे अधिक बळ प्राप्त झाले आहे, त्याचेच फलित म्हणून राज्यघटनेच्या उद्देशिकेतून ‘धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद’ शब्द जाणून-बुजून वगळण्यात आला. हा पूर्वनियोजित कट असून या मुल्यांचा प्रसार करणारे याच धर्मनिरपेक्ष आणि समाजवादाचा पुरस्कार करणार्या पानसरेवर हल्ला करण्यात आला आहे, या घटना भारताच्या सार्वभौमिकतेला धक्का देणार्या आहेत. अशा घटनेमुळे सांप्रदायिकतेला खतपाणी घालण्याचे काम केले जात आहे. प्रतिगामी संघटनांना सरकार वचक बसवण्यात अकार्यक्षम ठरले आहे. दाभोलकरांच्या हत्येनंतर त्याच पद्धतीने कॉ. गोविंद पानसरेंवर जीवघेणा हल्ला होतो, पुरोगामीपणाचा वारसा देशाला देणार्या महाराष्ट्रात दिवसा-ढवळ्या अशा घटना घडत आहेत. सामान्याची सुरक्षा तर सरकार करत नाही, पण निदान असामान्य कार्यकर्त्यांना तरी सुरक्षा पुरवा, असे मत गोविंद पानसरे यांच्या हल्ल्याच्या निषेधार्थ पुण्यात झालेल्या निषेध सभेत विविध कार्यकर्त्यांनी मांडले.
आज सकाळी कोल्हापूर येथे कॉ. गोविंद पानसरे यांच्यावर खूनी हल्ला झाला त्याच्या निषेधार्थ पुण्याच्या विधान भवन येथे शहरातील पुरोगामी संघटनेकडून निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी सहभागी कार्यकर्ते बोलत होते. यावेळी प्रा. सुभाष वारे, कॉ. अजित अभ्यंकर, शमसुद्दीन तांबोळी, संजय दाभाडे, अनवर राजन, सय्यदभाई, प्रतिमा परदेशी, मेघना थत्ते यांच्यासह शहरातील महाविद्यालयातील विद्यार्थी, विविध पुरोगामी संघटना आणि त्यांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
धर्मांध फॅसिस्ट संघटना देश व राज्य पातळीवर वाढत आहेत, त्यामुले हिटलरी वृत्तीत वाढ होत आहे, नथुरामचे छुपे समर्थक आता बाहेर येऊन नथुरामला राष्ट्रप्रेमी म्हणून मिरवत आहेत, त्यास दैवत्व देऊन त्याची मंदीरे उभारण्याचा संकल्प या भाजप सरकारकडून राबविला जात आहे. पुलाला या देशद्रोहीचे नाव देऊन नथुरामचे उदात्तीकरण चालवले जात आहे. तरीही केंद्र सरकार गप्प आहे, या संघटनांच्या विरोधात कोणतीच कायदेशीर प्रक्रिया राबवली जात नाही. अशा प्रतिगामी संघटनांना शह देणार्या गृहविभाग आणि सरकारचा आम्ही धिक्कार करतो आहे. या घटनेने पुन्हा एकदा पुरोगामी महाराष्ट्राची मान खाली घातली आहे. वर्ष उलटला तरी दाभोलकरांचे हत्यारे मोकाट फिरत आहे. त्यांना अटक केली नसल्याने सरकारकडून त्यांना अभय देण्यात आल्याने आज कॉ. गोविंद पानसरे यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यासाठी सरसावल्या आहेत. याची सर्वस्वी जबाबदारी सरकारने घ्यावी, व दोषींना तात्काळ शासन करावे, आम्ही आपणास ठणकावून सांगतो आहे की, अशा घटनामुळे आमचा विवेकाचाआवाज कमी होणार नसून तो आवाज अधिक बुलंद होणार आहे, असे संतप्त उदगार कार्यकर्यांनी यावेळी काढले.
प्रतिगामी संघटनेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत, सरकार आणि सुरक्षा यंत्रणेचा निषेध करण्यात आला. या घटनेचा तपास लवकरात-लवकर पूर्ण करुन दोषींवर कडक कारवाई करावी यासाठी जिल्हाधिकार्याला निवेदन देण्यात आले.

वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
राजा ढाले यांच्या लेखनीतून : घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या अजस्त्र पण सुस्त मुंबईत काही घटना, घडामोडी घडताहेत. खरं म्हणजे मुंबईची घडी-मोड ह...
अपनी बात

- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com