पुण्यातील ‘महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटीन एज्युकेशन’ सोसायटीच्या एकूण 29 शैक्षाणिक संस्थाची सुमारे दहा हजार मुस्लिम विद्यार्थी-विद्यार्थीनी आपल्या पारंपारिक वेशभूषेत शिवजयंतीच्या मिरवणुकीनिमीत्त गुरुवारी पुण्याच्या रस्त्यावर होते. अशा आशयाची बातमी स्थानिक हिंदी दैनिकात आली. महाराष्ट्राच्या विविध भागातून याच आशयाच्या बातम्या, फोटो, कोट शिवजयंतीदिनी सोशल मीडियावर फिरत होते.
कोणी शिवरायांना कुळवाळीकुळभूषण म्हणत होता, तर कोणी गोब्राह्मणप्रतिपालक, यावर वाद-विवाद करणारे देखील कमेंट बॉक्समध्ये आग-पाखड करत होते. तुळजाभवानीच्या तलवारीवर आपल्या शब्दांची धार लावणारेदेखील मोठ्या संख्येने होते. जो कोणी शिवबाचे पोवाडे सोशल कट्ट्यावर गात होता, प्रत्येकजण आप-आपल्या परीने शिवराय मांडण्यासाठी ‘टाईमलाईन’ची वॉल रंगवत होतं.
फोटो, कंटेन, माहिती, पुस्तकाचे उतारे, संवाद, हास-उपहास, मोठ्या प्रमाणात टॅग, हॅशटैग, ट्विट, रिट्विट कमेंट, लाईक्स, सुपर ट्रेंड शिवाजी महाराजांचा जयजयकार करत होते. विषेश म्हणजे ‘सोशल कट्ट्या’वर दिवसभर एक विषय प्रामुख्याने जास्त चघळला जात होता, तो म्हणजे महाराज मुस्लिम द्वेशी नव्हते अशा आशयाचा मजकूर फिरत होता. त्याचे मोठ-मोठी पुस्तकी रेफ्रंन्सेस दिले जात होते. जो-तो महाराजांचे मुस्लिम प्रेम आप-आपल्या सोयीनं लावत होता.
सरांनी शिकवलेल्या धर्मद्वेशी आणि रंगद्वेशी इतिहासामुळे वर्गातला मोहन मात्र समस्त मुसलमानी भाषेवाल्यांना मात्र अफजला खानच्या अवलादी समजायचा, त्यामुळे वर्गातला सलम्या इतिहासाचे आगामी धडे बघून सहसा शाळेतून गैरहजर राहायचा. दुसर्या दिवशी कांबळे म्हणायचा ‘कारे सल्ल्या, काल प्रतापगडावर लपून बसला व्हता का?’ मास्तर अफजल खानाचा कोथळा शाहिस्तेखानाची बोटे, मोगलांविरोधातील लढाई समस्त मुस्लिम आणि इस्लामविरोधी लढाई कशी होती रंजीतपणे शिकवायचे, मास्तरचे प्रत्येक शब्द सलम्याच्या कोवळ्या बालमनावर प्रहार करायच्या, अफजल खानाच्या धड्यानंतर सबंध वर्ग, सलम्याला खानच समजायचा, त्यांच्या नजरा बघून सलम्याला वाटायचं आता घेतीलच हे माझ्या नरड्याचा घोट
दुसर्या दिवशी कांबळे म्हणायचा ‘कारे सल्ल्या, काल प्रतापगडावर लपून बसला व्हता का?’ मास्तर अफजल खानाचा कोथळा शाहिस्तेखानाची बोटे, मोगलांविरोधातील लढाई समस्त मुस्लिम आणि इस्लामविरोधी लढाई कशी होती रंजीतपणे शिकवायचे, मास्तरचे प्रत्येक शब्द सलम्याच्या कोवळ्या बालमनावर प्रहार करायच्या, अफजल खानाच्या धड्यानंतर सबंध वर्ग, सलम्याला खानच समजायचा, त्यांच्या नजरा बघून सलम्याला वाटायचं आता घेतीलच हे माझ्या नरड्याचा घोट.
अशा भितीदायक वातावरणात आम्ही इतिहासाचे रंजीत द्वेशधारी धडे गिरवले. मोठे होता, ‘जय भवानी... म्हणत शेजारचा संभादादा रहीमकाकावर धावून जाताना पाहत होतो. त्यामुळे शाळेत आणि इतर वेळी चर्चेत शिवराय बस्तीवाल्या पोरांना नको असायचे. “जय भवानी, जय शिवाजी” म्हणत दंगल घडविली जात होती, आम्ही दाराच्या फटीतून सर्व पाहत होतो, आणि महाराजांबद्दलच्या द्वेशभावाला वाढवत होतो. शिवाजीचे नाव घेऊन मुंबईमध्ये मुस्लिमांची संपत्ती जाळली, दलितांवर अमानुष अत्याचार केलं गेलं. शिवगर्जना देणार्यांनी मुंबईत दक्षिण भारतीयांना सळो की पळो करुन सोडलं. अशीच शिवगर्जना देऊन अगदी अलिकडे पुण्यात मोहसीन शेखचा मर्डर घडवून आणला गेला.
शिवजयंतीनिमीत्त सोशल मीडियावर गुळमुळीत कंटेट वाचून माझ्यासारख्याला प्रश्न पडतो. शिवरायांच्या नावानं दंगली घडविताना कुठं गेली होती ही बहुजनप्रतिपालक शिवप्रजा, आणि त्यांचा शिवप्रेम. ज्या महाराजांनी प्रत्येक धर्माचा आदर केला, त्याच महाराजांच्या नावानं धार्मिक तेढ निर्माण केला जात आहे. ज्या महाराजांनी इतर धर्मीयांच्या प्रार्थनास्थळांची राखण व त्याचे जतन केलं, त्याच धार्मिक स्थळांना शिवप्रेमी म्हणवणारे मावळे गुलालानं रंगवण्यास धजत नाहीत.
एकीकडे “रयतेच्या भाजीच्या देठालासुद्धा हात लावता कामा नये” असं म्हणणारे शिवछत्रपती, आणि दुसरीकडं रयतेच्या मालमत्तेची लूट करायला टपलेली मावळ्यांची प्रजा. आया-बहिणीची अब्रू राखणारे शिवछत्रपती आणि त्याच माय बहिनीची विटंबना करणारे शिवभक्त. शिवबाच्या स्वराज्याची संकल्पना हिच होती का? बहुजनप्रतिपालक शिवरायाची प्रतिमा एका साचेत बंद करुन टाकून समाजद्वेश पसरवली जात आहे, महाराष्ट्रात विविध संघटनांनी शिवबाला हायजॅक केलंय, आपल्या पोसलेल्या इतिहासकाराने शिवरायांना इतिहासापुरतं मर्यादित न ठेवता भाषा, जात, धर्म, संस्कृती, यातील कुळचट राजकारण्याच्या हवाली केलं. इतिहासकाराच्या कृपेनं महाराजांना दैवत्व प्रदान करण्यात आलं, या देवाचा इतिहास नव्या पिढीला माहितीरंजनाच्या स्वरुपात सांगण्यात येऊ लागला.

कथा कादंबर्यातून सोयीचे शिवबा साकाराले जाऊ लागले. यात रंजकता तर आलीच, सोबत काही मिथकं व शौर्याच्या कहाण्या आल्या. हिंदू, क्षत्रिय, मराठा यांचे ब्रँड म्हणून कडवेपणाचे उदात्तीकरण करणं सुरु झालं. आणि बघता-बघता शिवाजी पुस्तकातून बाहेर आला. पोस्टर्स, सिनेमा, व्याख्यानातून आम्ही मिळेल तो शिवबा स्विकारत गेलो. जागतिकीकरणामुळे शिवरायाचं ‘मटेरिरियल मार्केट’ उभं केलं गेलं, हा ‘कमोडिटी शिवबा’ थेट इंटरनॅशनल बँड पर्यंत येऊन पोहचला. शिवजयंतीला ग्लॅमर प्राप्त झाले आणि डीजेच्या अश्लिल ठेक्यावर मावळे ताल धरु लागले.
कोथळा, मुजरा, हिंदूभिमानी स्लोगन्सची उत्पादने व्हॅन, चौक, ऑफिसमध्ये सजू लागली यातून मिळणारे महाराज आम्ही सहज स्विकारत गेलो. शिवरायांची कट्टर हिंदूधर्माभिमानी, मुस्लिम द्वेष्टा, गोब्राम्हणप्रतिपालक, जातवर्णाभिमानी अशी प्रतिमा जनमाणसात रुजवली गेली. त्याचे फलित कळायला एक तप उलटावा लागला. इतिहासाचा दुराग्रह कशामुळे झाला हे आता नवीन सांगायची गरज नाहीये. याची उत्तरे सर्वांनाच ठाऊक आहेत. राजकारण आणि सत्तेसाठी समाजात विद्वेशाची बीजे पेरणे हा एकमेव हेतू डोळ्यासमोर होता हे आता हळूहळू कळू लागले आहे. कुळचट आणि विद्वेशी राजकारणाला बळी पडून हे सर्व आम्ही केलं असं आता चाळीशीत असलेली पिढी म्हणत असली तरी, आपल्या पाल्यांला आतातरी योग्य दिशा द्यावी असं त्यांना अजूनही वाटत नाही, ही मोठी शोकांतिका आहे.

आता काळ बदलला, इतिहासलेखन बदलले विशिष्ट कॅटेगरीतल्यांची बालभारतीची मक्तेदारी संपुष्टात आली होती, कांबळे, शिंदे, भोसले, शेख यांची तरुण पिढी इतिहास लिहू लागली वाचू लागली होती. त्यातून तरुण समाजशास्त्रज्ञ आणि विचारवंत उदयास येत आहेत. संस्कृती, धर्म, तत्वज्ञान याची नवी मांडणी बाहेर येऊ लागली. रामचंद्र गुहा, इरफान हबीब, एजाज अहमद, राजमोहन गांधी इत्यादि मंडळी जागतिक स्तरावर इतिहासाची सत्य माहिती, वेगळा दृष्टीकोन, आकलन आणि भाष्य बाहेर काढू लागले होते. महाराष्ट्रात शेजवलकर, कॉम्रेड शरद पाटील, मा.म. देशमुख, श्रीमंत कोकाटे, सदानंद मोरे इत्यादी मंडळी अगदी वेगळा आणि सत्य इतिहास मांडू लागली, त्यामुळे खरा इतिहास दडब्यातून बाहेर येऊ येत होता.
शिवाजीच्या सैन्यात 35 टक्के मुस्लीम होते. शिवाय 33 अंगरक्षकांपैकी 11अंगरक्षक मुस्लीम होते. महाराजांची लढाई धर्माविरुद्ध नसून सत्तेविरोधात होती अशी मांडणी बाहेर येऊ लागली. महाराजांचे गुरु कोण, भवानी तलवारीचं काय, तुकारामाचा खूनच झालाय, असं सत्य बाहेर येऊ लागली होती. “शिवचरित्र आणि एक” “शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला” सारखी नाटकं मास कम्यूनिकेशन घडवू लागली, आता खरा इतिहास बाहेर येत होता. त्यातच कॉम्रेड गोविंद पानसरेंचं “शिवाजी कोण होता” या व्याख्यानाची सिरीज सुरु झाली. या सर्वात तरुणांचे योगदान खुप महत्वाचं आहे. तरुण पिढी आता नव्या इतिहासाची आणि वर्तमानाची मांडणी करु लागल्याने माहितीचं जनरलायझेशन झाले आहे. आणि त्यातून सत्य स्वरुपात प्रचंड माहिती समाजमनावर आदळू लागली.
अलिकडे मुस्लिम संघटनाकडून शिवाजी महाराजाबद्दल चर्चासत्रे, परिसंवाद घेण्यात येऊ लागली आहेत, दोन वर्षापूर्वी ‘छत्रपति मुस्लिम ब्रिगेड’ सारखी संघटना मुस्लिम समुदायात “मुस्लिमात शिवाजी” पोहचावायचा प्रयत्न करत आहेत. याच बॅनरखाली दहा हजार मुस्लिम तरुण रायगडावर घेऊन गेल्याचं संघटक “कर्नल सुरेश पाटील” यांच्याकडून ऐकलं आहे. काल शनिवारी ता 21 फेबला ठाण्याच्या गडकरी रंगतयान मधे “छत्रपति शिवाजी महाराज मुसलमानाचे शत्रू होते का?” असा विषय असलेले चर्चासत्र झाले. सदर कार्यक्रमास शिवसेना, विहीप ने विरोध केला होता, तरीही कडेकोट व चोख बंदोबस्तात हा कार्यक्रम पार पाडला.
कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या हत्येनंतर सदर काम बंद पडण्याचा धोका आहे. हल्ल्यानंतर या पाच दिवसात सुमारे दिड लाख प्रति “शिवाजी कोण होता?’ पुस्तकाच्या खपल्या आहेत. (छोटेखानी जीवनचरित्र कानडी, उर्दू, गुजराथी, इंग्रजी, हिंदी भाषेत सुद्धा भाषांतरित झालेले आहे) हे एका वेगळ्या विचार क्रांतीचे द्योतक आहे असं देखील म्हणता येऊ शकते. कॉ. गोविंद पानसरे यांची हत्त्या ही मानवतेची हत्त्या आहे.
तुम्ही खरे बोलाल, इतिहासाची चिकित्सा कराल तर संपवून टाकू असा संदेश मारेकरी देऊ इच्छित असाल परंतु ही दहशत महाराष्ट्र खपवून घेणार नाही, विचार पटत नाही म्हणून एखादा माणूसच संपवणे, ही हुकुमशाही उद्या प्रत्येकाच्या श्वासावर देखील बंधने आणू पाहिलं, म्हणूनच अशा घटनांचा निषेधच व्हायला हवा. गोविदंराव पानसरे एक विचारवंत आणि समतावादी लेखक होते ते मीमासंक देखील होते त्यांच्या विचाराची हत्या केली गेली परंतु विचार मरणार नाहे हे मारेकर्याला कुठे माहीत असेल.

जागतिकीकरणानंतर मानवी आयुष्यात आमुलाग्र बदल घडून आले आहेत. राहणीमान, विचारप्रणाली प्रचंड बदलली. इंटरनेट माध्यमाने वर्च्यूअल का असेना पण जागतिक संवाद घडवून आणला आहे, आंतरजालातून अफाट माहितीचं दालन अचानक समोर आलं, त्यातून नवी विचारप्रणाली डेव्हलप होत गेली. इंटरनेटच्या या प्रचंड माहितीजालात आजचा यंगस्टर्स भरकटलेला आहे असं नेहमी म्हटलं जातं, हे काही प्रमाणात खरं असलं तरी पूर्णत: सत्य नाही. प्रचंड आदळणार्या माहितीतून ‘इनफर्मेटीव्ह सोसायटी’ उदयास आली असून त्याचा वापराने शिक्षण, व्यवसाय, राहणीमान, विचारमान यात लक्षणिय बदल घडवून आणले आहेत. कदाचित त्यामुळेच आजचा तरुण अधिक विचारी बनला आहे. अल्पशी का असेना अभ्यासू वृत्ती तरुणामध्ये जोपासली जात आहे.
तरुणांमधे सत्यशोधकी विचार रुजायला सुरु झाली आहे, इतिहास, राज्यशात्र, भूगोल, समाजशास्त्र, तत्वज्ञान, मानवंशशास्त्राचं आकलन वाढलं असून धार्मिक आणि जातीय आयडेंटीटी संपुष्टात येऊन आजचा यंगस्टर्स विचारी बनू लागला आहे. या विचारी वृत्तीने खरं काय आणि खोटं काय हे तपासण्याचा विवेक तरुणात रुजत असून त्यातून वैचारिक प्रगल्भता वाढत आहे. तर्क, आकलन, चिंतन आणि मनन तरुणांमध्ये वाढत आहे. त्यामुळेच पारंपारिकतेला तर्कशास्त्राची जोड देण्यात येऊ लागली आहे.
भलं ते देऊ आणि भलं ते स्विकारु अशी वृत्ती तरुणांमध्ये वाढत असून ही नव्या बदलाची नांदी म्हणता येईल. माहितीचा प्रचंड मारा होत असताना खरं आणि खोटं काय याची पारख करणं अवघड झालं असलं तरी अशक्य नाही, सत्याची आणि भल्याची पारख करुन समाजाला योग्य तेच देऊ आणि स्विकारु असा बदल घडण्यात काहीच अवधी लागणार नाही.
कलीम अजीम, पुणे

वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
राजा ढाले यांच्या लेखनीतून : घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या अजस्त्र पण सुस्त मुंबईत काही घटना, घडामोडी घडताहेत. खरं म्हणजे मुंबईची घडी-मोड ह...
अपनी बात

- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com