पानसरे सर बोलताय का? पलिकडून आवाज, होय
बोलतोय...
नमस्कार सर मी अमुक-तमूक..!
“आम्ही पुण्यातील मराठवाडा मित्र मंडळ संस्थेतर्फे दरवर्षी 19 फेब्रुवारीला शिवजयंती साजरी करत असतो, यावेळी जयंतीचे पारंपारिक भाषण न ठेवता ‘धर्मनिरपेक्ष शिवाजी महाराज’ यासंबधी खुली चर्चा आम्ही ठेवायचे योजिले आहे, आणि त्यासाठी तुम्हाला आमंत्रित करत आहोत” “आम्हाला आपल्याकडून ‘मुस्लिमांचे शिवाजी महाराज’ जाणून घ्यायला आवडेल”
पानसरे: छान विषय ठेवला आहे, असे प्रयोग व्हायला पाहिजे आणि चर्चादेखील चांगली होईल...! परंतु मी या कार्यक्रमासाठी येऊ शकणार नाही, कारण आमची पक्ष कार्यकारिणीची बैठक आहे 21 फेब्रुवारीला, सध्या मी त्याच तयारीत आहे. त्यामुळे आपण दुसरा कोणी वक्ता बोलवा..!” ”
नमस्कार सर मी अमुक-तमूक..!
“आम्ही पुण्यातील मराठवाडा मित्र मंडळ संस्थेतर्फे दरवर्षी 19 फेब्रुवारीला शिवजयंती साजरी करत असतो, यावेळी जयंतीचे पारंपारिक भाषण न ठेवता ‘धर्मनिरपेक्ष शिवाजी महाराज’ यासंबधी खुली चर्चा आम्ही ठेवायचे योजिले आहे, आणि त्यासाठी तुम्हाला आमंत्रित करत आहोत” “आम्हाला आपल्याकडून ‘मुस्लिमांचे शिवाजी महाराज’ जाणून घ्यायला आवडेल”
पानसरे: छान विषय ठेवला आहे, असे प्रयोग व्हायला पाहिजे आणि चर्चादेखील चांगली होईल...! परंतु मी या कार्यक्रमासाठी येऊ शकणार नाही, कारण आमची पक्ष कार्यकारिणीची बैठक आहे 21 फेब्रुवारीला, सध्या मी त्याच तयारीत आहे. त्यामुळे आपण दुसरा कोणी वक्ता बोलवा..!” ”
मी: सर अलिकड-पलिकडची कोणतीही तारीख चालेल, पण
तुम्ही या..!
पानसरे: शक्य नाही, पुढचे दोन आठवडे मी व्यस्त
आहे, पण फेबच्या शेवटच्या आठवड्यात मी येईन” मी: ठिकंय सर चालेल लावतो तुम्हाला फोन परत दोन आठवड्यांनी..!
गुरुवार 12 फेब्रुवारी 2015 रोजी
कॉम्रेड गोविंद पानसरे आणि माझ्यात घडलेला संवाद.
सोमवारी मी काही कामानिमीत्त सुसगाव
येथे असलेल्या ताईकडे गेलो असताना तिथं कोल्हापूरहून आमचे मित्र राजरत्न कोसम्बी
यांचा फोन आला. ‘कॉम्रेडवर जीवघेणा
हल्ला झाला आहे’ त्यांना तीन गोळ्या लागल्या आहेत, त्याचा आवाज भरुन आला होता, जास्त न बोलता त्याने
फोन ठेवला. बातमी ऐकताच मी जागीच शॉक झालो होतो.
दोन वेगवेगळं कम्यूनिकेशन, मात्र दुवा एकच
कॉम्रेड पानसरे.
वेस्ट इंडीज आणि आर्यलँडचा मॅच बंद करुन मी ‘न्यूज चॅनल लावलं’ बातमी पेक्षा राजने दिलेल्या
अपडेट जास्त होत्या. सुन्न मनाने सर्वाना अपडेट दिल्या. पुढच्या एक तासात पुण्यातील
समविचारी मंडळी रानडेत जमली, पुढच्या कृती कार्यक्रमाची
तयारी झाली होती. चार वाजता ‘विधान भवन’ येथे या हल्ल्याविरोधात धरणे आणि निदर्शने असल्याची सिटी अपडेट कळाली. ठरल्याप्रमाणे
निदर्शने आणि जोरदार घोषणाबाजी झाली. गल्ली ते दिल्ली बातम्या पुरवल्या, व्हीडिओ अपडेट यू ट्यूबला लिंक केली, शक्य होईल
तेवढी पुण्यातील आंदोलनाची न्यूज स्प्रेड केली.
दोन संवाद दोन घटना, बरंच साधर्म्य होतं यात,
यावेळी शिवजयंती वेगळ्या प्रमाणे साजरी करायची असा विचार जानेवारी
महिन्यापासून सुरु होता. मी, सचिन पवार, सुजीत पाटील आम्ही तिघांनी याविषयावर बरीच चर्चा केली होती. त्यातून
गोविंद पानसरेंना बोलवण्याचा विचार आला. आणि ठरलं मार्च महिण्याच्या पहिल्या
आठवड्यात कॉम्रेड पानसरेंना बोलवायचे......!
आणि आजची बातमी गोविंद आण्णा आता येणार नाही, "शिवाजी कोण होता" सांगायला....!
यावर आता विश्वास बसत नाहीये...!
आण्णा आम्ही तुमच्या विचाराला नक्कीच जीवंत ठेवू....
अखेरचा लाल सलाम.......!
कलिम अजीम
पुणे
वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
राजा ढाले यांच्या लेखनीतून : घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या अजस्त्र पण सुस्त मुंबईत काही घटना, घडामोडी घडताहेत. खरं म्हणजे मुंबईची घडी-मोड ह...
अपनी बात
- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com

