आप आणि चाय पे चर्चा


“वो छप्पन इंच भी सिकुड गया, बेदी का तिलिस्म भी बिखर गया. तेरे नौलखिया परिधानों को, दो टकिया मफलर निगल गया” “मोदी : कितने आदमी थे? शाह : सरकार, वह एक ही है..! मोदी : और तुम? शाह : सरकार, चारसौ एमपी-एमएलए, दो लाख आरएसएस वर्कर और मीडिया.. मोदी : फिर भी हार गये....!” मंगळवारी दिवसभर अशा आशयाचं व्हॉट्स अप मॅसेज स्मार्ट म्हणवणार्‍या फोन्सवरुन फिरत होती.
जोडीला मफलर आणि कोट चे विशेषणं जोडून अगदी खुसखुशीत मॅसेज विरोधी गटाची चेष्ठा करण्यासाठी वापरली जात होती. एरवी राजकारणावर न बोलणारा ‘सोशल मीडिया’ मात्र यावेळी भाजपची थट्टा करण्यात अग्रेसर होता. प्रत्येक फेसबुकर्स काही न काही ‘वन लाईन स्टेट्स’ आपल्या टाईमलाईनच्या भिंतीवर रंगवत होता. न्यूजचॅनल हॅश टॅगच्या माध्यमातून डिक्सशन घडवून आणत होते. त्यामुळे ट्विटरवर तासागणिक ट्रेंड बदलत जात होते, अख्खा भारत आपच्या इलेक्शन रिझल्टच्या चर्चेत मग्न होता. ‘गल्ली ते दिल्ली’ ‘आप आणि केजरीसेना’ यांच्या ‘न भूतो न भविष्यती’ यशाची चर्चा रंगली होती.
पुण्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कम्यूनिकेशन अँड जर्नलिझम विभागाच्या आजी-माजी विद्यार्थ्यांनी आम आदमी पक्षाच्या निवडणुक निकालावर सर्वपक्षीय चाय पे चर्चा घडवून आणली. एफ. सी. रोडच्या रानडे इन्स्टिट्यूट बिल्डिंगच्या कँटीनमध्ये रमेशभैय्याच्या चहासोबत आपचे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य व पुण्याचे लोकसभेचे उमेदवार प्रा.सुभाष वारे यांनी सहभाग नोंदवला होता. आपची रणनिती, अजेंडा, प्रचार, जाहिरनामा, आश्वासने, प्रत्यक्ष कृती कार्यक्रम यावर वारे यांनी प्रकाश टाकला. चर्चा ऐन रंगात असताना विभागाच्या वतीने राजकीय चर्चा इथं करु नये असं बजावण्यात आलं. 
एका विशिष्ट विचारसरणीचे फॅन फॉलोअर निर्माण करण्यासाठी व्याख्यानाच्या श्रृंखला घेणार्‍या या विभागाला या चर्चेचं काय वावडं असावं कुणास ठाऊक, असो. त्यानंतर भाजप, माकपा, काँग्रेस यांच्या पदाधिकार्‍यासोबत बाहेरच फुथपाथवर नुक्कड चर्चा रंगली या चर्चेत फर्ग्युसन, मराठवाडा मित्रमंडळ, गोखले इंस्टिट्यूट, मॉडर्न महाविद्यालय, गरवारे, आणि विद्यापीठाच्या विविध विद्याशाखेचे विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार मुक्तचर्चेत सहभागी झाले होते. सुमारे दोन तास दिल्ली इलेक्शनच्या विविध घटनाक्रमावर प्रकाश टाकण्यात आला. 
बीजेपीचा पराभव, काँग्रेसचा मस्तवालपणा, आणि आपच्या स्थानिक स्वराज्य संस्थेत सहभाग अशा विविध घटकावर प्रश्नोत्तरे झाली. येणार्‍या काळात शेतकरी संघटना, मजूर संघटना बांधणीवर आप लक्ष देणार असल्याचे वारे यांनी यावेळी सांगितले, सीएसडीएस संस्थेच्या माध्यमातून योगेंद्र यादव यांनी देशभर अनेक सर्व्हे पार पाडले आहेत. देशातील राज्यशास्त्रातील राजकीय प्रक्रियेच्या अभ्यासकामध्ये त्यांचे नाव अग्रक्रमाने घेतलं जातं. त्यांच्या नेतृत्त्वाखालील टीमनं आपच्या सर्व्हेचं काम पार पाडलं. त्यांच्या टिमने इलेक्शन काळात दर आठवडयाला प्रत्येक मतदारसंघनिहाय सर्व्हे करून मतदारांच्या बदलत्या कलाचा अंदाज घेतला अशी माहिती पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारणीचे सदस्य सुभाष वारे यांनी यावेळी दिली.
लोकसभा निवडणुकीत ‘आप’ला मोठा पराभव स्वीकारावा लागला होता, त्यानंतर लगेचच आपने सर्व्हे करून मतदारांनी का नाकारले याची चाचपणी सुरु केली. गोपनीय पद्धतीने सर्व्हे करून पक्षाला दर आठवडयाला ‘इनपूट’ पुरविणार्‍या राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांच्या नेतृत्त्वाखालील सर्व्हे टिमचा मोठा वाटा आहे. टप्प्याटप्प्याने सर्व्हे करीत वोटर्सचा बदलता कल जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. निवडणुका घोषित झाल्यानंतर प्रत्येक मतदारसंघानिहाय दर आठवडयाला सर्व्हे करण्यास सुरूवात केली. 
यादव यांनी सर्व्हेसाठी कार्यकर्त्यांची विशेष टीम तयार करुन त्यांना दिल्लीतील मतदारसंघ वाटून देण्यात आले होते. मतदारांची नस लक्षात आल्यानंतर आम आदमी पक्षाने पॉझिटीव्ह प्रचार राबविला. बीजेपीच्या निगेटिव्ह मार्केटींगला ‘आप’ने पॉझिटिव्ह उत्तर दिले. पक्षानं भाजपच्या व्यक्तिगत कुरघोडीवर लक्ष न देता रिक्षाचालक, व्यापारी, नोकरदार, गृहिणी, तरूण, ज्येष्ठ नागरिक यांना संघटीत करण्याचं काम केजरीवाल यांनी केलं. दिल्ली शहरातील स्थलांतरीतांचे प्रश्न समजून घेऊन त्यांच्याबरोबर ‘नुक्कड सभा’ घेण्याचा सपाटा आपच्या कार्यकर्त्यांनी लावला होता. 
घराघरात आपचे कार्यकर्ते आपली ओळख लपवून फिरत होते. लोकांचे प्रश्न समजून घेत होते. यांच्याकडून दर आठवडयाला छोटी प्रश्नावली भरून घेतली जायची. त्यामध्ये साधारणत: या निवडणुकीमध्ये ते कोणत्या इश्यूंना महत्त्व देतात, दिल्लीचे सर्वात महत्त्वाचे प्रश्न त्यांना कोणते वाटतात, पॉलिटीकल पार्टीजकडून त्यांना काय अपेक्षा आहेत, ते कोणाला वोटींग करण्याच्या विचारात आहेत आदी प्रश्नांची उत्तरे त्यांच्याकडून घेतली जायची. दर आठवडयाला होणार्‍या सर्व्हेतील विश्लेषणाची माहिती त्या-त्या मतदार संघातील उमेदवाराला दिली जायची. एखादा भागात पक्षाला कमी रिस्पॉन्स मिळत असल्याचे लक्षात येताच लगेच त्याठिकाणी एक्स्ट्रा कार्यकर्ते पाठविले जायचे. त्यामुळेच अनेक ठिकाणचा पराभव विजयामध्ये बदलण्यात आपला यश आलं. सर्व्हे या आपच्या टिमच्या योगदानामुळेच देशात एकूण जागांच्या तुलनेत सर्वाधिक जागा जिंकण्याचा ‘न भूतो न भविष्यती’ असा विक्रम ‘आम आदमी पक्षा’ला करता आला.
उल्लेखनिय म्हणजे आमा आदमीला भुलवणार्‍या नावासारखे अनेक पक्ष दिल्ली निवडणुकीच्या रिंगणात होते. अतुल्य भारत पार्टी, गरीब आदमी पार्टी, गरीब राज पार्टी, दिल्ली जनता पार्टी, नया दौर पार्टी, असंख्य समाज पार्टी या पक्षांचे एकूण 133 उमेदवार रिंगणात होते, त्यांना एकूण वीस हजारांवर मते मिळाली आहेत. परंतु आम आदमीची खरी नस आपलाच पकडता आली आहे. त्यामुळेच राजीनामा दिल्यानंतर बरोबर एक वर्षानंतर म्हणजे 14 फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाइन डेला अरविंद केजरीवाल पुन्हा दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत आहेत. उपोषण, आंदोलनं, जाहीर सभा तसेच देश ढवळून काढणारे लोकपाल आंदोलन जिथे झाले त्या रामलीला मैदानावर पुन्हा एकदा ऐतिहासिक शपथविधी पार पडला.
देशात तिसरा राजकीय पर्याय म्हणून आम आदमी पार्टीकडे बघितलं जात असून सर्वधर्मीय श्रीमंत आणि गरिब वर्गाला एकत्र आणण्यात आम आदमी पक्षाला यश आलं आहे. आपच्या रुपानं भारताला सक्षम असं राजकीय नेतृत्व लाभलं असल्याचा आनंद देशातील आम  आदमीला होत आहे. प्रस्थापित पक्षांमध्ये जात-पातीच्या उतरंडीला कंटाळलेल्या तरुणाईला आप पक्षानं भारावून टाकलं आहे. नवख्या कार्यकर्त्याला कामाचं स्वातंत्र्य, मोकळीक, त्यांच्या सर्जनशिलतेला वाव मिळत असल्याने आप तरुणाईमध्ये लोकप्रिय ठरत आहे. औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पत्रकारितेचे शिक्षण घेणारा 22 वर्षाचा धनंजय सुरवसे म्हणतो की, येणार्‍या काळात तथाकथित सेक्युलर पक्षाचे आणि विकासाचे मुखवटे धारण करणार्‍या पक्षापेक्षा आम आदमीसाठी झटणार्‍या पक्षासोबत काम करायला मला आवडेल. तर त्याच विद्यापीठात कॉम्प्यूटर सायन्समध्ये पीएचडी करणारा मझहर काझी म्हणतो की, आम आदमीचा विचार करणारा आप हा एकमेव पक्ष असल्याचं सध्यातरी दिसत आहे, वीज पाणी सारख्या मुलभूत प्रश्नांऐवजी धार्मिक अस्मितेच्या गप्पा करणार्‍या आणि विकासाचं मीडिया बाता मारणार्‍या पक्षाला आम्ही लोकसभेत निवडून दिलं ही आमची सर्वात मोठी घोडचुक ठरली. ही चुक दुरुस्त करण्याची वेळ येत्या स्थानिक स्वराज्य संस्थेत आली आहे, त्यासाठी येणार्‍या काळात आपसारखा पर्याय सक्षमी ठरेल त्यामुळे तरुणाईने आपसोबत येण्यास काहीच हरकत नाही. पुना कॉलेजमध्ये एम.एस्सी करणारा 21 वर्षीय सलमानशेख म्हणतो एम.आय.एम. पेक्षा आप कितीतरी पटीनं चांगला म्हणावा लागेल. कारण एमआयएमनं मुस्लिमांवर अन्याय कसा होत असतो हेच सांगण्यात धन्यता मानली, परंतु तो कसा दूर करता येईल याबद्दल मात्र एमआयएम कुठेच सांगत नाही. तसेच विशिष्ठ वर्गाचे आयडेंटीटी पॉलिटीक्स रेटण्यात एमआयएम व्यस्त आहे. त्यामुळे दाल रोटीची भाषा करणारा आप कितीही चांगला आहे.
भाजपच्या नऊ महिन्याच्या वादग्रस्त विधानाच्या आणि कॉर्पोरेट हिताच्या सत्तेचं फलित धर्मातंर, विवादीत भाषणं, नथुरामचं उदात्तीकरण आसि तत्सम घटनामुळे सरकारला दिल्लीत पराभव आल्याचं स्पष्ट आहे. यामुळेच राष्ट्रपतीनं 26 जानेवारीच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतीनी स्पष्ट म्हटलं होतं की, धर्म हे संघर्षाचे कारण बनू नये म्हणत धर्मांतरावर जोरदार टीका केली. सत्तापक्षाने आपली संवैधानिक आणि लोकशाही जबाबदारी ओळखावी.  सरकारची जबाबदारी आहे की, स्वच्छ, कुशल, पारदर्शी आणि उत्तरदायी शासन द्यावे राष्ट्रपतीनं भाषणात मागील काही दिवसापासून सुरु असलेल्या भडक वक्तव्यानं आंतरराष्ट्रीय पातळीवर लोकशाही देशाची प्रतिमा डागाळेल अशी भिती व्यक्त केली. ओबामाने देखील अमेरिकन सिनेटचं सर्कुलर वाचून दाखवलं तरीही भाजपच्या लक्षात ही गोष्ट आली नाही. भारतीय जनतेनं नऊ महिन्यातच सरकारला नाकारले आहे. माध्यमाच्या जोरावर अल्पावधीत मिळवलेली लोकप्रियता अल्पावधीतच घटली असल्याने यासंबधी आत्मचिंतन भाजपनं वेळेवर करावी अशी अपेक्षा.

पुणे

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,49,इस्लाम,38,किताब,24,जगभर,129,पत्रव्यवहार,4,राजनीति,297,व्यक्ती,21,संकलन,61,समाज,258,साहित्य,77,सिनेमा,22,हिंदी,53,
ltr
item
नजरिया: आप आणि चाय पे चर्चा
आप आणि चाय पे चर्चा
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiZzsmyWuvi6xwiQLMH7nSJUbBOexhxCvWuFKbqtSwDqHEK_6VezJukauyyzVM383YH7OLPVafaWt3pkPPA1oX5n88xOoVGG_u3_ANzEbDPNaw9ZcS78kV_0CgPbJFycbdoKdt_loDcERtq/s1600/10492074_786395038105891_1799177942157810681_n.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiZzsmyWuvi6xwiQLMH7nSJUbBOexhxCvWuFKbqtSwDqHEK_6VezJukauyyzVM383YH7OLPVafaWt3pkPPA1oX5n88xOoVGG_u3_ANzEbDPNaw9ZcS78kV_0CgPbJFycbdoKdt_loDcERtq/s72-c/10492074_786395038105891_1799177942157810681_n.jpg
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2015/02/blog-post_15.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2015/02/blog-post_15.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content