सोशल कट्टा : ते नऊ तास


सदराचे नाव “सोशल कट्टा”

रविवारीय पुरवणीत लिहायचं म्हटल्यास प्रथम माझ्या डोक्यात विचार आला काय लिहावं? बराच विचार केल्यानंतर कल्पना आलीहलकं फुलकंलिखाण द्यावं. प्रासंगिक घटनाचा मागोवा घेत तत्कालिकतेची जोड देता यईल का? असं प्रथम डोक्यात आलं आणि त्यातून सदर ललित लिखाणाच्या कल्पनेची निर्मिती झाली. महानगरातील जगणं, कॉलेज लाईफ, बॅचलर लाईफ, तरुणाई , चंद नातेसंबध, प्रेम, ब्रेकअप. लाईफस्टाईल, मुक्तछंद, साहित्य, कला, सिनेमा, ट्रेकिंग, बाईकिंग, हॉटेलिंग, अभ्यास, कॉलेजविश्व, बिनधास्तपणा या सगळ्या गोष्टींना  सामाजिक घटनांना व्यक्तिंशी कनेक्ट करुन चर्चा करता यईल या हेतूने “सोशल कट्ट्यावर ” जशी वेगवेगळ्या विषयावर चर्चा केली जाते. मत-मतांतरे मांडली जातात. मनातलं खाजगीपण शेअर केलं जातं, मित्रांना किंवा जवळच्या सहकार्‍यांना टोमणा मारुन आपल्या मनातलं सांगता येतं,या सोशल कट्ट्यावर प्रेमानं भांडता देखील येऊ शकते. मनातलं खूप काही सांगायचं असतं पण सांगता येत नाही. त्यामुळे फेसबुक, ट्विटर गुगल+, सारखे माध्यमं उदयास आली. आणि मुक्तपणे संवाद सुरु झाला आणि चर्चेला उधाण आलं हे उधान या सदरातून मांडण्याचा माझा अट्टाहास असेन......

लेख पहिला

ते नऊ तास
महिण्याचा दुसरा शनिवार असल्याने ऑफिसला सुट्टी होती. त्यामुळे शुक्रवारी रात्री उशीरापर्यंत हुसेन जमादार यांचं “जिहाद” वाचत होतो. उशिरा झोपून उशिरा उठावं असा बेत होता,रात्री जागरण झालं असल्यामुळं गाढ झोप लागली होती. त्यातच सकाळी सहाच्या दरम्यान अंबाजोगाईहून भाऊचा फोन आला. नदीम रात्रीपासून घरी आला नाही, पुण्यात तुझ्याकडे आला का? पलिकडचे शब्द ऐकून माझं अवसानच गळालं. मी गोंधळून जागा झालो. उत्तरादाखल “माझ्याकडे तो आला नाही म्हणालो” “तो काल दुपारपासून घरी नाही, सगळीकडे चौकशी व शोधाशोध केली तो कुठेच नाही पलिकडून भावाचे शब्द कानावर येत होते. मी अवस्थ झालो, भाऊने ठीक आहे मी बघतो म्हणत फोन ठेवून दिला. माझी झोप कधीचीच उडून गेली होती.
नदीम हा आमचा लहान भाऊ इंजिनीअरिंगची प्रवेश फेरी सुरु असताना कुठे गेला कळेना, कोणतेही प्रेशर किंवा दडपण त्यास नव्हते, (असा आमचा समज होता, हे नंतर कळलं) बारावीत जेमतेम टक्क्यावर पास झाला होता, तरी त्यास कोणी काहीच म्हटले नाही. मग अचानक कसा व कुठे निघून गेला असा विचार मी करत होतो. तो कधी बाहेर पाहूण्याकडेसुध्दा कधी गेला नव्हता, लग्न समारंभ त्यास नको असत. मित्रांचा जस्त गोतावळा त्याचाकडे नव्हता. त्यामुळे आम्ही सगळे चिंतेत होतो. कुठं जाणार? काय करणार? रात्र कुठं काढली असेन, जेवला असेल की, नाही. सतत नको असलेले विचार डोक्यात येत होते. घरातील सगळेच घाबरलो होतो. सगळीकडे विचारपूस, चौकशा झाल्या कुठेच त्याचा पत्ता नव्हता.
पुढील दोन तास फोना-फोनी केली. त्यानं आपला मोबाईल घरीच ठेवून गेला होता. त्यामुळे संपर्क करण्याचा प्रश्नच नव्हता. मनाला समजुत घालत होतो. सलग दोन सुट्ट्या असल्याने माझे नियोजन होते. बीड येथील दैनिकात रविवारीय पुरवणीसाठी लेख अजून दिलेला नव्हता. त्यामुळे तो देणं भागंच होतं. तशाच अवस्थेत अपूर्ण लेख पूर्ण करुन मेल केला. घरी जावे लागणार होतं, अम्मी आदल्या रात्रीपासून रडत होती. अब्बू व गावाकडे एकटा असलेला भाऊ शोधून-शोधून त्रस्त झाले होते. मोठा भैय्या मुंबईहून निघाला होता. कसेबसे बारा वाजले रुममध्ये एकटाच होतो, त्यामुळे अस्वस्थता वाढली. दुपारी कोथरुडला दोन नियोजित कार्यक्रम होते, तिनला गांधीभवनला युक्रांदची सिंचन धोरणावर चिंतन होते, तिथं दि.मा. मोरे, पुरंदरे, माधव गाळगीळ अशी मंडळी येणार होती. त्याआधी बारा वाजता यशवंतराव सभागृहात “..भीमनगर अंडरग्राऊंड मोहल्ल्या”चा प्रयोग होता. दोन्ही कार्यक्रमाचा आग्रह असल्याने टाळता येत नव्हते. भीमनगरची पास घेऊन राजरत्न थांबला होता. त्याचे फोनवर-फोन येत होते. पंचवटीतून पीएमटीनं अस्वस्थ अवस्थेत निघालो. बाहेर पाऊस कोसळत होता आणि मनात विचार, लहानपणापासून त्यास आम्ही बाहेर पडू दिले नव्हते, त्यामुळे तो एक्कलकोंडा झाला होता. सतत दडपणाखाली असे कॉलेज, कॉम्प्यूटर, क्रिकेट असंच त्याचं जग होतं, घरातही कोणास तो मोकळेपणाने बोलायचा नाही, सतत आत्मकेंद्री असायचा, आम्ही सगळेच त्यास कम्युनिकेट करायचा प्रयत्न करत असू पण तो बोलायचा नाही. मित्रासोबत बाहेर फिरत असल्याने मीदेखील दोन-तीन वेळा त्यास चांगला हटकलो होतो. सगळ्यांना कळून चुकलं होतं चूक आपलीच आहे. घरचे सगळीच मंडळी आपआपसात स्वत:लाच दोष देत होती.
मित्र, नातेवाईक, हॉस्पिटल, रस्ते, तळे, विहिरी सगळं शोधून झालं होतं, पोलिसात तक्रार देण्यास गेलो असता भाऊला पोलिसांनी बोळवण करुन पाठवली होती. येईल तो, रागावून गेला असेन अशी केस आमच्याकडे दररोज येतात. नंतर नातेवाईक येऊन सांगतात इसम परत आलाय. यामुळे मी तक्रार घेत नाही, दोन दिवसानंतर या मग बघू म्हणंत परत पाठवले. पोलिसांनी भाऊची समजूत घातली अन् भाऊने स्वत:ची. मी घरी भाऊला तीन वेळा फोनवरुन संवाद साधला होता. आईला बोलायचं धाडस अजून जमा करु शकलो नव्हतो. मनातली घालमेल वाढत होती. आता कोणत्याच कार्यक्रमाला जायची इच्छा उरली नव्हती. यशवंतराव क्रॉस करुन थेट कुणालकडे गेलो. त्याला भेटल्यावर थोडेसं बरं वाटलं. मी येतो म्हणाला तुमच्या सोबत काळजी करु नका, येईल तो. आमचा भाऊदेखील असाच गेला होता. आई रडून-रडून बेजार होती, आला परत चार महिन्यांनी. काळजी करु नका असाच येईल तोही परत. म्हणत कुणालने दिलासा दिला. मला घेऊन शिवाजीनगरला आला अधून-मधून माझे धैर्य वाढवत होता. महत्वाची कामं सोडून बसस्टॉपवर माझ्यासोबत थांबला होता. माझ्या खिशात पैसे कोंबत म्हणाला काही गरज पडली तर कळवा तात्काळ हजर होतो.
बस आली त्यावेळी साडे तीन झाले होते चारला सुटणार होती. अंबाजोगाईला पोहचेपर्यंत बारा वाजणार होते. सुमारे नऊ तासाचा प्रवास होता. आता बसमध्ये एकटाच होतो. मनात वेगळाच कल्लोळ चालला होता. बसची नेहमीची गर्दी यावेळी वेगळी वाटत होती. सगळ्यांचे चेहरे वाचत होतो. सगळ्यांची कहानी इथं वेगवेगळी असावी. कोणी घरी जात असेन, कोणी हॉस्पिटलने परतत असेन, कोणी नोकरीसाठी तर कोणी नोकरी सोडून जाता असेन, कोणी माहेरी जात असेन, तर कोणी सासरी. प्रत्येकजण आपल्याच धुंदीत होते अन् मी माझ्या. नेहमी रोमँन्टिक वाटणारी बसची विंडो यावेळी भयाण वाटत होती. बसच्या गतीसोबत मनातली विचारदेखील पळत होते. नको असलेला विचार आला की, मन घाबरं होत, लगेच सावरलं तर विचारांची आदळआपट वाढत असे. नऊ तास हे सगळे सहन करत, सोसत स्वत:चा त्रागा करत होतो. घरी आलो त्यावेळी रात्रीचे साडे बारा झाले होते. अम्मीनं दरवाजा उघडला तिचा चेहरा पार कोमेजला होता. रडून-रडून थकल्याची चेहर्‍यावर व्रण दिसत होती. तिला दोन शब्द बोलून न जेवताच कॉटवर आडवा झालो. झोप येत नव्हती. उठून पोलिसांना देण्यासाठी काढून ठेवलेले नदीमचे फोटो चाळत बसलो. फोटो बघून अजून अस्वस्थता वाढू लागली. अल्बम ठेवून तासभर तसाच बसून राहिलो. रात्री दिडच्या सुमारास माझा सेल वाजला अनोळखी नंबर होता. पलिकडून आवाज आला “हॅलो भैय्या मै नदीम बात करा रहा हूँ , तुम कहाँ हो, मै यहाँ पूना स्टेशनपर हूँ” आवाज ऐकून स्वर्गपप्राप्तीचा आनंद झाला. मी लगेच आलो म्हणत त्यास लँडमार्क सांगितला आणि तिथंच थांब म्हणालो. फोनमालकाला बोललो तो युपीवाला बहादूर नावाचा अ‍ॅटोवाला होता. त्यास फोन लावून दिल्याबद्दल मनापासून धन्यावाद दिले.
रात्रीचे दोन वाजले होते, दुसर्‍याच क्षणी पुण्याला फोन लावला अशा अडचणीच्या वेळी नातेवाईकापूर्वी आठवण येत ती फक्त मित्रांचीच. तेच ऐनवेळी मदतीला धावून येतात. कोथरुडला पाटीलांना फोन लावला त्यांना घटना माहीत होती. गाढ झोपेत असलेल्या पाटीलांना माझ्यापेक्षा जास्त आनंद झाला होता. लगेच ते स्टेशनकडे निघाले. त्यांना नदीमची ओळख नव्हती. म्हणून त्या अ‍ॅटोवाल्याला फोनवरुन डेक्कनला सोडायला सांगितले व अ‍ॅटोवाल्याचा मोबाईल नंबर पाटलांना दिला. पाटील अ‍ॅटोवाल्याआधी डेक्कनला पोहचले होते. अवघ्या वीस मिनिटात भाऊ पाटीलाकडे सुखरुप होता. माझी घालमेल कमी झाली. घरातलं वातावरण शांत झालं होतं, धाकधूक कमी झाली होती. त्याचक्षणी पुण्याकडे परत निघालो. भाऊला आजही माहित नाही की मी त्यादिवशी पुण्यात नव्हतो. खरंच आभार, धन्यवाद, याची गरज मैत्रीत नसते त्याहीपलिकडचे हे नाते असते.
इंजिनिअरिंगमध्ये त्यास आर्किटेक्चर करायचे होते, जेईई दिली होती. मी विरोध करत इंजिनीअरिंगचं आलेलं रेसिशन त्यावर लादलं आणि फॉरेंसिक सायन्स फॉर्म भरण्यास भाग पाडलं मला त्यास फॉरेंसिक सायन्स अथवा केमिकल टेक्नालॉजी करायचं होतं मेन सीईटी त्यानं दिली नव्हती. म्हणून मी फॉरेंसिचा आग्रह करत होतो. सीईटी दिली नसल्याने पॉलिटेक्निकचं भूत त्याच्या मानगुटीवर बसलं होतं. मला त्यास पॉलिटेक्निकला पाठवायचं नव्हतं, नुसत्या पॉलिटेक्निक त्यास नोकरी लागणार नव्हती, डिग्री करणं भागंच होती म्हणजे ते पॉलिटेक्निकचे दोन वर्षे अक्षरश: वाया जाणार होती. आमचा आग्रह होता वर्षभर थांबून त्यानं सीईटी द्यावी अन् पुढच्या वर्षी डिग्रीला अ‍ॅडमिशन घ्यावं असा आमचा सगळ्यांचा आग्रह होता. मी त्यास माझे हे व्यवहारिक गणित पटवून दिले होते. त्यावेळी तो काहीच बोलला नाही, होकारार्थी मान हलवली. मला वाटलं माझा मुद्दा त्यास पटला असावा. हा माझा भाबडा आशावाद ठरला. शुक्रवारच्या नमाजनंतर अम्मीला झेरॉक्स आणतो म्हणून बाहेर पडला तो गायबच झाला.
खरंच आपण आपली मते इतरावर अक्षरश: लादत असतो. इतरांच्या मताचा आपण आदर करत नाही, आपलाच मुद्दा खरा आणि व्यवहारिक वाटतो. कळत-नकळत आपण इतरांना खूप दुखावत असतो. समोरच्या व्यक्तीची आपण हेटाळणी करतो.  मी निवडलेलं क्षेत्र हे माझाच निर्णय होता हे मी त्यावेळी का विसरलो असावं. माझ्या निर्णयाचा कोणीच विपर्याससुध्दा केला नव्हता. मग मी हे का केले. याचा मला पश्चाताप होतोय. प्रत्येकांना आपली आवड निवड जपण्याचा अधिकार असतो, त्यांनी तो जपावा आणि इतरांनी त्या निर्णयाचा मान राखावा.

कलिम अजीम
पुणे

(लेखक सुंबरान मासिकाचे कार्यकारी संपादक आहेत)

मुळ लेखाची लिंक http://www.dailyprajapatra.com/oldedition/p-6-m.php?i=28JUL2014

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,49,इस्लाम,38,किताब,24,जगभर,129,पत्रव्यवहार,4,राजनीति,297,व्यक्ती,21,संकलन,61,समाज,258,साहित्य,77,सिनेमा,22,हिंदी,53,
ltr
item
नजरिया: सोशल कट्टा : ते नऊ तास
सोशल कट्टा : ते नऊ तास
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEivvOicLp__fhHGB0iHHXacQv2UKzw-Qi9SZeP8rQfU9fHdIrTRDtqqZmcfVdlMvGUrLQTAyITbbcZlvGjufbsafnoT2lLkajUOXNGpNxHcZoDyC0gNC2sACFV7uJ0PI5ZBQ_h-xnhWdFQ2/s1600/Kalim+Ajeem+12.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEivvOicLp__fhHGB0iHHXacQv2UKzw-Qi9SZeP8rQfU9fHdIrTRDtqqZmcfVdlMvGUrLQTAyITbbcZlvGjufbsafnoT2lLkajUOXNGpNxHcZoDyC0gNC2sACFV7uJ0PI5ZBQ_h-xnhWdFQ2/s72-c/Kalim+Ajeem+12.jpg
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2014/08/blog-post.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2014/08/blog-post.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content