जगातील
इतर देशाचा विचार येता प्रथम डोळ्यासमोर येतात. ते भारत-पाक-चीन हे त्रीकूट देश.
नेहमी काही न काही मुद्दे घेऊन भारताचे शेजारी राष्ट्र सतत चर्चेत राहिले आहेत, मग पाकिस्तान मधील लष्करी
राजवट असो, वा
माजी पंतप्रधानाची हत्या किंवा हाफिज सईद किंवा दाऊद हे नेहमी वादग्रस्त मुद्दे
भारताला छळत आले आहे. तर दुसरा शेजारी राष्ट्र चीन अवघं जगाचं मार्केट अर्थात
बाजारपेठ काबीज करण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच, महासत्ता होण्यासाठी
अमेरिकेची स्पर्धा करु पाहत आहे. हा देश भारतासंबधी वेगळ्या कारणाने सतत चर्चेत
असतो. का ते पुढे पाहू.
पाकिस्तान
अखंड
हिदुस्तानातून 1947 साली फाळणीनंतर भारतातून “ईस्लामिक रिपब्लिक ऑफ
पाकिस्तान” या
नव्या देशाची निर्मिती झाली. तो आता पाकिस्तान या नावाने ओळखला जातो. तदनंतर
पाकिस्तानने भारताशी तीन युध्द केले. तीनही युध्दात पाकिस्तानचा पराभव झाला. पण तो
अद्यापही पाकिस्तानने स्विकारला नाही.
पाकिस्तान
हा दहशतवाद्यांचा पोशिंदा म्हणूनही ओळखला जातो. शिया-सुन्नी वाद कबायली हल्ले, सततचे आहेत. जगात सर्वात
जास्त दहशतवादी हल्ले हे एकट्या पाकिस्तानमध्ये होतात. प्रत्येक महिण्यात
एखादा तरी दहशतवादी हल्ला येथे होतो. तरिही जगातील कट्टर
ईस्लामी राष्ट्र म्हणून गौरव करण्यात देखील कमी पडत नाही. गेल्या दशकभरात
पाकिस्तानने “वादग्रस्त” देश म्हणून आपली प्रतिमा मलीन करुन घेतली आहे.
काही
ठळक मुद्दे...
- पाकिस्तान जगाच्या नकाशावर आला. शाहिन या परमाणू क्षेपणास्त्रामुळे.
- अमेरिकेने अफगाणिस्तान विरोधात पुकारलेल्या अघोषी युध्दात पाकिस्तानने युध्दासाठी जागा देऊ केली. व आपल्यावर लादलेले सारे निर्बंध उठविण्यास अमेरिकेला बांधील केले. ज्या लादेनमुळे अफगाणिस्तान बेचिराख झाले , तोच लादेन पाकिस्तानमध्ये वर्षानुवर्षे लपून होता.
- माजी पंतप्रधान बेनजीर भुत्तो यांची हत्या.
- असिफ अली जरदारी राष्ट्रपती.
- भारतात 26 नोव्हेंबर 2008 साली आतंकवादी हल्ला घडवून आणला.
- अतिशय गोपनियरित्या अमेरिकेने पाकिस्तानमध्ये अबोटाबादला एका गुप्त मिशनद्वारे लादेनला ठार मारले.
- अमेरिकेकडून अनेक युध्दसाहित्याची खरेदी.
- हिना रब्बानी खार आणि बिलावल प्रकरण.
- भारत विरोधात चीनशी हातमिळवणी करुन युध्दसाहित्याची खरेदी केली आहे.
- उघडपणे चीनशी मैत्री करुन भारताच्या विरोधात चीनचा वापर करण्याचा हेतू.
इत्यादि, असे अनेक विषय आहेत.
ज्यामुळे पाकिस्तान हा देश जगात वेगवेगळ्या कारणासाठी चर्चेत असतो. निर्मिती नंतर
अजूनही तेथील सामान्य जनता अत्यंत दारिद्र्याखाली जगत आहे. मुल्ला मौलवीचे राजकीय
पटलात प्रशासकीय व्यवस्था होरपळत असून, राजकीय अस्थिरता निर्मितीला जन्म देत आहे. तसेच, अधूनमधून बलुचिस्तानची
मागणी अंतर्गत सुरक्षेला धोका उत्पन्न करत आहे. खाप पंचायती चे निर्णये अधून मधून
जागतिक पटलावर पाकचे छि-थू करत असते. असे असंख्य मुद्दे आहेत.
चीन
भारताचा
दुसरा शेजारी राष्ट्र ‘चीन’ कम्युनिस्ट देश म्हणून ओळखला जात असला तरी सोशालिस्ट मॉडेल राष्ट्राने
आत्मसात केले आहे. हिंदी-चीनी भाई-भाई म्हणत चीन भारतावर 1961 साली चालून आला. तोच
चीन आता भारतात बाजारपेठ काबीज करण्याच्या हेतूने शिरकाण करत आहे. चीनसंबधी काही महत्वाचे
मुद्दे....
- ईलेक्ट्रॉनिक वस्तुंद्वारे भारतीय घरा-घरात सध्या चीन पोहचला आहे.
- गणपतीपासून ते स्वंयपाक घरातील लसूण पर्यंत प्रत्येक वस्तु या चीनमधील आहेत.
- मोबाईल, शोभेच्या वस्तु, खेळणी, शैक्षाणिक साहित्य, कपडे, अलंकार, वास्तुरचना (फेंगशुई), खाद्यपदार्थ.
- अॅटोमोबाईलच्या वस्तु, नामाकिंत कंपन्यांचे स्पेअर पार्ट तयार करुन जगात स्वत:ची वेगळी गरज निर्माण केली आहे.
- आशिया खंडातील मोठी बाजारपेठ असलेला चीन हा एकमेव देश आहे.
- अवघ्या बाजारपेठेच्या जोरावर महासत्ता होण्याचे स्वप्न चीन पाहत असला तरी अमेरिका सारख्या बलाढ्य देशापुढे चीन काहिच नाही.
- चीनने अनेक अत्याधुनिक युध्दहत्यारे विकसीत आहेत. भारतापेक्षा जास्त क्षमता असलेली क्षेपणास्त्र चीनकडे आहेत.
- समुद्री नौका, हवेतून हवेत तसेच, जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र, पायदळ, नौसेना, वायुसेना मोठी आहे.
- भारत चीन युध्दानंतर अनेक वाद सीमेबद्द्ल झाले आहेत. तसेच, घुसखोरी मोठ्या प्रमाणात चालू असल्याच्या बातम्या माध्यमातून झळकत असतात. तरिही भारत यासंबधी मौन भूमिका बाळगत आहे.
- पाकव्याप्त काश्मिरमध्ये, म्यानमार, तसेच, श्रीलंकेत आपली बंकर उभी करुन भारताला चोहिकडून घेरले आहे.
इशान्य
भारताकडून घुसखोरी हळूहळू सुरु आहे. भारतावर हल्ला करण्यासाठी पाकिस्तान सोबत
मैत्री केली आहे. पाकिस्तानमध्ये चीनने आपले युध्द बंकर उभे केले असून एकिकडे चीन भारतासोबत संबध दृढ करण्याचा
प्रयत्न करत आहे तर दुसरीकडे भारतावर चालून येण्याच्या दृष्टीने कारस्थाने करत
आहे. ही भारताच्या दृष्टीने खूप चिंताजनक बाब आहे. असे असले तरी भारत
आंतरराष्ट्रीय संबध चांगले करु पाहत आहे.
बाजारपेठ, शेती, संशोधन, उच्चशिक्षण, विज्ञान प्रसार, आरोग्य संबधी तंत्रज्ञान
चीनने विकसीतकेले आहे. अल्पावधीतच जगाचे लक्ष आपल्याकडे वळवून घेणारा चीन भविष्यातील महासत्ता होणार हे नक्की.
कलिम
अजीम, पुणे

वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
राजा ढाले यांच्या लेखनीतून : घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या अजस्त्र पण सुस्त मुंबईत काही घटना, घडामोडी घडताहेत. खरं म्हणजे मुंबईची घडी-मोड ह...
अपनी बात

- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com