अलमगीर मनचक्षुतील हळवा कोपरा

त्रकारिता शिक्षणासाठी २००९ साली अंबाजोगाई सोडून औरंगाबादला दाखल झालो. साहजिकच मनात त्यावेळी अनामिक भिती दाटली होती. मुख्यत: तिथं राहण्यासंदर्भात माझी काळजी अधिक होती. कारण प्रथमच दीर्घकाळासाठी घराबाहेर पडलो होतो. तशी माझी आर्थिक स्थिती बेताचीच होती.

अंबाजोगाई सोडलं त्यावेळी खिशात जेमतेम दीड-दोन हजार होते. तेही शिलाई कामातून साठवलेले. शिवाय घरातून एक दमडी मिळणार नसल्यची खात्री होती. अर्थात घेरातून रुपया घ्यायचं नाही, असं ठरवलं होतं. पुढे काय होईल, असा प्रश्न नव्हता. कारण शिलाई कामाचं कौशल्य अंगी होतं. परंतु नव्या शहरात राहण्यासोबतच खायचे देखील वांधे होणार होते.

परतुं शिक्षण घेणे माझ्यासाठी क्रमप्राप्त होतं. कारण वयाच्या २३व्या वर्षी नव्याने सुरुवात करीत होतो. गेली सात-आठ वर्षे टेलरिंग करीत होतो. त्यातून बाहेर पडण्यासठी पुन्हा शिक्षण सुरू केलं होतं. भविष्य सावरण्याच्या उद्दीष्टांनी भारावलो होतो. त्यामुळे मिळे ती परिस्थिती, येईल ते संकट स्वीकारण्याची तयारी केली होती.

विद्यापीठात पहिल्याच दिवशी एक सुषेन जाधव नावाचा सोबती भेटला. तो माझा वर्गमित्र होता. त्याच्या रुमवर शेअरिंगची एक जागा रिकामी होती. महिना दोन हजार असं त्याचं भाडं होतं. परंतु ते दोघांमध्ये अर्धे-अर्धे होणार होते. एक मोठं ओझं हलकं झालं होतं. मला झालेला तो आनंद आजही स्मरणात आहे.

सोबत आणलेली छोटीशी बॅग घेऊन त्याच्या रुमवर गेलो. रुम अगदी विद्यापीठाच्या म्हणजे जर्नलिझम विभागापासून पायी अंतरावर होती. विद्युत कॉलनीतून तो मार्ग जात होता. कुंभारवाड्याजवळ म्हणजे गोरोबा कुंभारच्या मंदिराला लागून ही इमारत होती.

रुम तर मिळाली पण नव्या शहरी मन लागत नव्हते. त्यावेळी जाधवने ती रिक्त जागा भरली. कदाचित त्यालाही माझ्यासारखा आघधार हवा असावा. आमच्यात खूप गप्पा रंगत. संध्याकाळी सोबतच फिरायला जात. ऐकून-बोलून मन हलकं होत. संध्यासमयी विद्यापाठाच्या गेटवर त्याच्यासोबत निवांतपणा वाटे. त्याने विभागातील अनेक ज्येष्ठ मित्रांच्या ओळखी करून दिल्या.

दोन-तीन दिवस राहून अंबाजोगाईला गेला. परत आलो तसं रमज़ान सुरू झाला. त्याठिकाणी टिफ़ीन बरोबर नसल्यामुळे इथं आधीच उपासमार सुरू होती. त्यात रमजान! घरी रमजानमध्ये रोजे होई. पण इथे नव्या जागी काहीच सोय नव्हती. बाजूलाच काली मस्जिदहोती, त्यामुळे नमाजला तेवढं जात होतो. पण करमत नव्हतं. विभागातही मन रमेना.

एकदा असर नमाजला मस्जिदला गेलो, दुआनंतर हदीस ऐकण्यास बसलो. मस्जिदमध्ये तुरळक चार-पाच नमाजीच होती.  नवीन असल्याने साहजिकच चौकशी सुरू झाली. आफताब नावाचा तो गृहस्थ कायदा शिक्षणातील संशोधक विद्यार्थी विद्यार्थी होता. मूळ जळगाव जिल्ह्यातला. त्याला मेसची अडचण सांगितली.

आफताबने मला विद्युत कॉलनी भागत असलेल्या छोट्याशा अलमगीर मस्जिदमध्ये काही विद्यार्थी राहतात. त्यांच्याकडे एक मेसवाला येतो. तुम्ही त्यांना जाऊन भेटा, म्हणाला. ही मस्जिद रुमपासून २०० मिटरवर होती. मगरिबला तिथं हजर झालो. एक बुटकी व्यक्ती, त्यास छोटीशी दाढी होती. सलाम-दुवा करून त्यांना अडचण कळविली. त्यांनी ती १०० टक्के सोडविण्याची हमी दिली. म्हणाले, “आता मला घाई आहे. विभागात जायचे आहे. तुम्ही तराविहनंतर या. इथं बाकीची लोक येतील. तुमची अडचण पटकन सुटेल मी त्यांना फोनवर कळवून ठेवतो.  

काही वेळात माझी मेसची अडचण सुटणार अशी आशा निर्माण झाली. नियोजित वेळी गेलो तसं तिथं अशफाख नावाचे एक गृहस्थ भेटले. त्यांनी म्हटलं, :आम्ही इथं सर्वजण एकत्रच सहरी करतो. तुम्हीदेखील या. इफ्तारही इथं मोठा होता. काही हरकत नाही, मेसची काळजी करू नका, एडजस्ट होईल.खूपसमाधान वाटलं. त्याच उत्साहात पळतच रुमवर आलो.

माझी मेसची अडचण सुटली पुढे त्याच मस्जिदमध्ये माझी राहण्याची सोयही झालीय. वरती मस्जिद व खालच्या मजल्यावर छोट्याशा खोल्या होत्या. त्यात विद्यार्थी राहत होते. मागे-पुढे न पाहता त्या मजहर-यूसुफ-अशफाख या त्रयीनीजागा शिल्लक नसतानाही मला राहण्यास बोलावलं. इथं तिघांनी माझ्या दोन्ही समस्या चुटकीसरशी सोडवल्या. शिवाय भाडे येईल तेव्हा द्या अशीही समजूत घातली. मला चिंतामुक्त केल्याने मी आयुष्यभर त्यांचा कृतज्ञ राहील.

पाच खोल्याचे हे लहान हॉस्टेल होते, इथल्या रुम छोट्या पण व्यवस्थित व नेटक्या होत्या. एकूण सातजण याठिकाणी होते. येथे मला तीन घनिष्ठ व जीवाभावाचे मित्र भेटले. पुढच्या काळात यांचे मला शैक्षिक व आर्थिक सहकार्य खुप लाभले. मज़हर, युसूफ, अशफाक आणि फ़ैयाज यांनी वेळेप्रसंगी आपल्या मोजक्या डब्यात मलाही सामावून घेतलं. पण अडचण जाधवला सोडण्याची होती. तोही अल्पकाळात जिवाभावाचा मित्रच झाला होता. मी रूम सोडतोय ते त्यासाठी असह्य झालं. साहजिकच त्याला वाईट वाटलं. नैराश्याने ग्रस्त होऊन तो माझी अडवणूक करू लागला.

आठवडा-दहा दिवस आम्ही एकत्र होतो. त्या दहा दिवसाचे ८०० रुपये मी त्याला देऊन टाकले. परंतु तो अधिक मागत होता. माझ्याकडे तेवढे पैसे नव्हते. बळच त्याला ८०० रुपये दिले आणि सटकलो. परंतु त्याने माझे काही सामान ठेवून घेतलं. मला त्याचा हा चेहरा फारच भेसूर वाटला. पण परिस्थितीने मी नाडलेला होतो. त्यामुळे काहीच करता आले नाही.

अलमगीरमध्ये मात्र मला खूप मानसिक स्थैर्य लाभले. मस्जिदचे केअरटेकर इस्माइल जनाब मला खूप भावले. पुढचे तीन वर्षे त्यांनी माझी खूप काळजी केली. बाकी मंडळीदेखील खूप चांगली होती. अंबाजोगाई सोडताना झालेली भिती नाहक होती, हे लवकरच सिद्ध झालं. अल्पावधीत मला मैत्रीचे दोन वेगवेगळे स्वरूप दिसले. पण पहिल्या अनुभवावरून खूप काही शिकता आलं.

अलमगीरमधील त्या चौघांचे आपलुकीसोबत माझ्यासाठी खिसेही ओसंडून वाहत होती. वाढत्या वयात शिकतोय, हे त्यांच्यासाठी कौतुकाचे होतं. त्यामुळे मला खूप हायसं वाटलं. हे अलमगीर हॉस्टेल माझ्यासाठी घराबाहेरचे घर ठरले. त्यामुळेच मला सुट्ट्यातही घराकडे जायला नको वाटायचं.

या तीन-चार मित्रांमुळे बरेच सुख-दुखा:चे क्षण मला औरंगाबादला जगता आले. पदवीच्या त्या तीन वर्षात अलमगीरच्या मित्रांनी खुप आत्मियता व आपलेपण दिलं. एकत्रच खाणे व झोपणे व्हायचे. शनिवार-रविवार नुसती धमाल असे. फैयाज शेख हे बायकेमिस्ट्रीमध्ये पीएडी करीत होते. तर मजहर कॉम्प्युटर सायन्स, तर यूसुफ गणित आणि अशफाख कॉम्प्युटर सायन्समध्ये मास्टर करीत होते. मी अशफाखच्या रुमध्ये सामावलो.

तिघांच्या खोल्या वेगेवेगळ्या असल्या तरी राहणं, खाणं, गप्पा मारणं एकाच खोलीत होत. शनिवार झाला की फैयाज भाई विद्यापीठाच्या सिद्धार्थ हटस्टेलमध्ये अलमगीरला येत. मग संध्याकाळी अंबा किंवा अफ्सराला सिनेमा ठरलेला असे. शिवाय तिथून बुढ्ढी लेनला येऊन नॉन व्हेजची मेजवाणी!

हा दिनक्रम तब्बल तीन वर्षे होता. आमच्या तिघापैकी फय्याज भाई त्यात जरासे सधन कारण त्यांना संशोधनासाठीच्या दोन फेलोशिप मिळत होत्या. त्यामुळे तेदेखील आमच्यावर सढळ हाताने सगळं खर्च करीत. आम्ही चौघांचा सिनेमा व खाण्याचा खर्च तीन-चारशे होई. आठवड्यासाठी तो पुरेसा ठरे.

तीन वर्षापूर्वी अलमगीर सोडताना मन भरुन आलं. काही वेळा रडलोदेखील. अलमगीर सुटतेय माझ्यासाठी ही कल्पनादेखील असह्य होती. पण स्थलांतर करणे भाग होतं. सेफ झोन सोडणे मी औरंगाबादलाच शिकलो. अलमगीर माझ्यासाठी सेफ झोन ठरला होता. अनेक स्वप्ने घेऊन मी इथं आलो होतो. मला त्या शहराने पद, नाव आणि सन्मान दिला.

एक वेगळ्या विश्वात सामावण्यासाठी उत्साह दिला. मास्टरकीचं शिक्षण तिथंही मिळालं असतं. पण मोह आवरता घेणं गरजेचं होतं. जिवाभावाचे, सुख-दुखाचे, आनंदगी सहवासाचे मित्र सोडून जाणे हृदयद्रावक होतं. पण पर्याय नव्हता.

अलमगीर सोडतोय याचा सर्वांत मोठा धक्का इस्माइल जनाबला म्हणजे आमच्या इमाम साहेबांना बसला. त्यानंतर बाकी वसर्व मंडळी. सर्वांचे चेहरे बघून मलाही निघावसं वाटत नव्हते, पण पुढील शिक्षणासाठी पुणे निवडलं होतं. त्यामुळे जाणे भागच होते.

माझ्यासारखे बरेच जण शिक्षण संपल्यावर अलमगीर सोडतात. असच एक-एकजण दरवर्षी कमी होऊन नवीन येत असतो. नवीन लोक कसेही असो, पण तेच प्रेम, करुणा, आपुलकी व माया अलमगीर जपून आहे. आजही अलमगीरमध्ये आपलेपणाची ती विशिष्ट पद्धत पाळली जाते.

पुण्यात आल्यानंतर मी अधून-मधून औरंगाबादला टक्कर टाकतो. काही काम नसतं पण मित्रांना व अलमगीरला भेटण्याचा मोह टाळू शकत नाही. औरंगाबादला गेलो तर नेहमी अलमगीरलाच उतरतो. नेहमी त्याच उत्साहाने अलमगीर हॉस्टेल माझ्या स्वागताला हजर असते. कधीही औरंगाबादला गेलो तर, हक्काचे ठिकाण अलमगीरच राहील. घरातून लांब असूनही मला बाहेर पडल्याची जाणिव क्षणिक सुद्धा होत नाही. पुण्यातील तिरस्कृत, हेटाळणी करमारे तुच्छतावादी वातावरण बघून अलमगीरची खूप आठवण येते. ती जागा माझ्या आयुष्यातील एक हळवा व संवेदनशील कोपरा आहे.

(३ जुलै २०१३ रोजी दिव्य मराठीच्या अनुभव सदरासाठी पाठवलेला लेख, तिथं प्रकाशित झाला नसल्याने इथं नजरिया वाचकासाठी खुला करीत आहे.)

कलीम अजीम, पुणे


वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,49,इस्लाम,38,किताब,24,जगभर,129,पत्रव्यवहार,4,राजनीति,297,व्यक्ती,21,संकलन,61,समाज,258,साहित्य,77,सिनेमा,22,हिंदी,53,
ltr
item
नजरिया: अलमगीर मनचक्षुतील हळवा कोपरा
अलमगीर मनचक्षुतील हळवा कोपरा
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2013/07/blog-post_12.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2013/07/blog-post_12.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content