महामहिम खासदार साहेब
सादर प्रणाम
पत्र लिहण्यास कारण की, पाच वर्ष संपत आलेत, पण अजूनही आपले लक्ष अंबानगरी अथवा समस्त बीड जिल्ह्याकडे चुकूनही गेले नाही. पण निवडणुकीत जिंकून यायला किती पैसा लागतो हे तुम्ही उघडपणे संगितलं. कदाचित हा पैसा तुम्ही मतदारावर खर्चा केला अशा अविर्भावात तुम्ही बोलत असावेत असा माझा अंदाज आहे, त्यामुळे हा पत्रप्रपंच करतो आहे..
‘माझ्या पहिल्या निवडणुकीसाठी केवळ २७ हजार रुपये खर्च झाला होता. गेल्या २००९च्या लोकसभा निवडणुकीसाठी तोच आकडा ८ कोटींवर गेला. निवडणूक आयोगाने हवी तर माझ्यावर कारवाई करावी...’
तुम्ही बीड जिल्ह्याचे खासदार आहोत, हे तुमचं विधान गेल्या काही दिवसात चर्चेचा विषय झाले आहे.
मी आपल्या जिल्ह्याचा रहिवासी आहे. आपण राज्याच्या उप मुख्यमंत्री असल्यापासून मी आपणास ओळखतो. मला आठवते, तुम्हास आठवते का माहीत नाही. आपण २००९ साली लोकसभेच्या 'खास'दारातून जाण्यासाठी निवडणूक प्रचारार्थ अंबोजागाईला प्रचार सभा घेतली होती. तुम्ही अंबानगरीतील महिला महाविद्यालयाच्या भव्य प्रागंणात आपण अनेक वायदे केले होते. त्यात अंबानगरीला I.T.- B.T. सिटी करणार, बायो-टेक पार्क शहरात तयार करणार. वर्षानूवर्ष प्रलंबित असलेल्या, बीड-अहमनगर-परळी रेल्वेमार्गाला गती देणार. त्वरित हे काम पुर्णत्वाकडे नेणार. तसेच अन्य बर्याच घोषणा केल्या होत्या, असो.
IT-BT सोडा पण तुम्ही एकदा तरी रेल्वेचा प्रश्न लावून धरला का? ऊसतोड कामगाराचे प्रश्न, सिंचन, महामार्ग (सुमारे चार वर्षापासून लातुर मांजरसुंभा व्हाया औरंगाबाद चार पदरी मार्ग, लातुर हद्दी पर्यंतच आहे, बीड जिल्ह्याचे शासकीय धोरण कमकुवत असल्यामुळे, आपल्या कारकिर्दीतही हे काम मार्गी लावू शकले नाही.) दरसाल उद़भवणारी दुष्काळी परिस्थिती. अशा तत्सम प्रश्नांसबंधी एकदाही लोकसभेत प्रश्न मांडला नाही. आपला सारा वेळ क्षेत्रीय व राज्यातील राजकारणारतच गेला. सरत्या काळात गावातील राजकारणात पुतण्यासोबतच भांडलात.
बीड जिल्ह्याचे तुम्ही स्वत:ला भूमिपुत्र म्हणता. हे फक्त राजकारणापुरतेच मर्यादित असते का? बाकी काळात तुम्हाला जिल्ह्याची आठवण का येत नसावी?? इथं सामान्य माणसाचे हाल सुरु आहेत. बसच्या जागेसाठी जीव गमवावा लागत आहे, तरी लोकप्रतिनीधी गप्प आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था लोकांचे जीव घेत आहे. आपण आठ कोटी कसे खर्च केले याचा हिशेब करण्यात व्यस्त आहात. मग परत म्हणता NDA ला निवडुन द्या. आपण अजूनही समजता का मतदार झोपेत आहेत.
लोकसभेची निवडणूक लढविण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करावे लागात हे गुपित तुम्ही उघड केल्याबद्दल आभार मानावे असं वाटतं. आपल्याप्रमाणे अनेक उमेदवार निवडणुकीत हजारो कोटी रुपये खर्च करीत असतीलही. मात्र, निवडणुकीसाठी उमेदवाराने किती खर्च केला, त्याची संपत्ती किती यापेक्षा त्यांच्याकडे पैसा येतो कुठून, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. खासदारांना दरमहा ५० हजार रुपये वेतन मिळतो, अधिवेशन किंवा विशेष बैठकीदरम्यान दैनंदिन भत्ता दोन हजार रुपये मिळतो, प्रवास भत्ता वेगळा आहे. टर्म संपल्यानंतर २० हजार रुपये पेन्शन आणि इतर सोयीसुविधा आणि प्रतिष्ठा मिळते.
खासदारांना मिळणारी रक्कम ही महिन्याला एक लाख रुपये इतकी गृहित धरली, तर पाच वर्षांची रक्कम ही ६० लाख इतकी होते. मग, इतक्या कमी रकमेत त्यांची संपत्ती गगनाला भिडते कशी, हा खरा प्रश्न आहे. त्यामुळेच, मुंडे यांच्या विधानाने राजकारण्यांकडून होत असलेल्या भरमसाठ भ्रष्टाचाराला पुष्टी मिळते. अन्यथा, अहोरात्र झटून जनतेची पाच वर्षे ‘सेवा’ करण्यासाठी केवळ साठ लाख रुपये मिळणार असताना ‘प्रतिष्ठे’पोटी आठ कोटी रुपये खर्च करावा लागणारा हा ‘बुडित’ धंदा कोण कशासाठी करेल? ता.क. सोशल मीडिया मोदीप्रणीत करण्यात आपल्या पक्षाला यश आले, त्याबद्दल अभिनंदन.
आपल्या जिल्ह्यातील एक विकास वंचीत ग़ट
पुरवणी नोट-
खासदारांचा २००९ लोकसभा निवडणूक खर्च
शरद पवार - १९ लाख ९ हजार ६३३
प्रफुल्ल पटेल - १३ लाख ४१ हजार
सुप्रिया सुळे - ११ लाख १६ हजार
राहुल गांधी - ११ लाख आठ हजार
सोनिया गांधी - १२ लाख
राजनाथ सिंह - १७ लाख ३३ हजार
सुषमा स्वराज - आठ लाख ९२ हजार
मुलायमसिंह यादव - १२ लाख ८५ हजार
अखिलेश यादव - २४ लाख ७५ हजार
लालूप्रसाद यादव - १४ लाख ६४ हजार
........................................................................
२००९ साली निवडून आलेल्या आमदारांची संपत्ती
अजित पवार - दहा कोटी ७८ लाख
पतंगराव कदम - १५ कोटी ११ लाख
नारायण राणे - १३ कोटी १९ लाख
छगन भुजबळ - सात कोटी ७५ लाख
जितेंद्र आव्हाड - चार कोटी ७९ लाख
हसन मुश्रीफ - तीन कोटी ४६ लाख
भास्कर जाधव - एक कोटी ४६ लाख
एकनाथ खडसे - तीन कोटी ९७ लाख
(संदर्भ - नॅशनल इलेक्शन वॉच)
कलीम अजीम, पुणे

वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
राजा ढाले यांच्या लेखनीतून : घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या अजस्त्र पण सुस्त मुंबईत काही घटना, घडामोडी घडताहेत. खरं म्हणजे मुंबईची घडी-मोड ह...
अपनी बात

- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com