म्हणतात
राष्ट्रपतींने आपणास 2020 पर्यंत आर्थिक महासत्ता होण्याचे स्वप्न दाखवले
आहे, पण यमाजी मालकरांच्या मते आपण आजच महासत्ता आहोत. 14
व 15 मे ला चिखलीत "भारताला गरज नव्या
अर्थक्रांतीची" या विषयावर त्यांचे व्याख्यान झाले, त्यानिमित्ताने सामान्याच्या
अर्थविचाराला थोडीसी का होईना गती मिळाली. आपल्या कर धोरणावर
विचार करण्याची गरज आज आहे. मालकरांच्या मते भारतात जगातील सर्वात मोठा सोन्याचा साठा आहे, म्हणजे 20 हजार टन. तसेच भारतीयांनी दोन दिवसात 15
टन सोनं खरेदी केलं, तसेच सुपीक जमिनीच्या
बाबतीत भारत जगात दोन नंबरवर आहे, जगातील तीन क्रमांकावर
भारतीय शेअर बाजार आहे. भारत G.D.P. मध्ये नवव्या क्रमांकावर
तर क्रयशक्तीच्या बाबतीत तीन वर आहे. या सगळ्या गोष्टी लक्षात घेता
भारत आजच महासत्ता आहे.
भारतात परदेशात
शिक्षण घेण्यासाठी दरवर्षी हजारो विद्यार्थी जातात,
शिक्षण झाल्यावर तिथेच स्थायीक होतात. म्हणजे आपल्याकडील उच्च
शिक्षीत मॅनपावर परदेशाला विकसीत करतात. आपली क्रयशक्तीचा वापर इतर देशासाठी करतात,
भारत सरकार कोट्यावधी रुपये यांच्यासाठी खर्च करतो आणि आपल्याला
त्याचे आऊटपूट काहीच नाही. तसेच मुबलक साधन संपती आहे, भारताने
जगाकडे मागणी करावी अशी एकही गोष्ट भारताकडे नाही. तरीही मुलभूत गरजासाठी आपणास
पायपीट करावी लागत आहे. असे असताना महासत्ता म्हणवून घ्यायला आपणास लाज वाटते.
साधनांनी आणि व्यवस्थेने आपणास बेशिस्त बनविले आहे, समुहांना
बदनाम करण्याचे काम आपण करतो आहे. व्यवस्थेबद्दल तक्रार असावी समुहाबद्दल नव्हे.
प्रत्येकाचे मुलभूत प्रश्न सुटले तर माणूस इतर प्रश्नांबद्दल बोलेल, व्यवस्था अशी द्या की माणूस तक्रार करणार नाही. आज माणूस प्रत्येक गोष्टीची तक्रार करायला लागला आहे, माणसाचे वैयक्तिक फ़्रस्ट्रेशन तो इतर समुहावर काढत आहे, म्हणूनच तो समुहाना बदनाम करत फ़िरु लागला आहे. यासर्वांसाठी
व्यवस्थेइतकीच माणसिक वृत्ती जबाबदार आहे.
माणूस स्वत:ला
असुरक्षीत समजू लागला आहे, प्रत्येकांना
भविष्याची चिंता सतावत आहे, यातूनच साठा करण्याची वृत्ती
बळावत आहे. असुरक्षिततेतून भावनेतून अवैध साठा करण्याची सवय निर्माण झाली आहे. पैसा, सोनं बाजारातून नाहीसं होत आहे. करप्रणालीत समानता नसल्यामुळे श्रीमंत
वर्ग अतीश्रीमंत होत आहे आणि गरिब अजूनही खालावत चालला आहे. त्यामुळे सामाजीक
अव्यवस्था निर्माण झाली आहे. मुकेश अंबानीच्या
बंगल्याची अर्धी किंमत एकट्या पुणे शहरातील मनपाचे बजट आहे म्हणजे पुण्यातील 30
कोटी जनतेवर 2300 कोटी आणि अँटेलिया वर 4500
कोटी खर्च; किती मोठी ही दरी.
पैसा सतत
पाण्यासारखा प्रवाहात असावा, कारण प्रवाह थांबला की पाणी गढूळ होणार. पैसा वैयक्तीक संपत्ती नाही,
पैशाचे तुम्ही फ़क्त राखणदारच मालक नव्हे. अमेरिकेसारख्या देशात
अडी-अडचणीला कामी येईल यासाठी फ़क्त 10 हजार पर्यंत रोख
बँकेत ठेवता येते, त्यावरील रकमेवर तुम्हाला
व्याज द्यावा लागतो, म्हणूनच अमेरिकेत पैसा बाजारात खेळता
राहतो. तेथे कर्जही सहजासहजी मिळते. आपल्याकडे परिस्थिती उलट आहे. कोट्यावधी रुपये
बेवारस पडून आहेत, अजूनही त्यावर हक्क सांगणारा कोणी पुढे
आला नाही. पैसा पाण्यासारखा आहे, पैसा हे फ़क्त विनिमयाचे
साधन आहे, संपत्ती नव्हे. लोभापोटी पैशाचा मोठा साठा निर्माण
होत आहे. रक्ताचे स्थान जसे शरिरात आहे तसेच स्थान पैशाचे आहे अभिसरण थांबले की
मृत्यू अटळ ...!
विकासकामे
करण्यासाठी पैसा हवा असतो, बारगळलेल्या योजना
पूर्ण करण्यासाठी पैसा पाहीजे, उपलब्ध पैशातच सर्वांची ओढताण
सुरु आहे, विकासाची धोरणे राबवायची असल्यास पैसा उभा करावा
लागतो. यासाठी आपली करप्रणालीत सुधारणा करावी
लागेल. सर्व व्यवहार बँकेमार्फ़त चालवायला हवे,
अप्रत्यक्ष कर कमी करुन सामान्याला
मोकळे श्वास घेता येईल अशी योजना तयार करावी लागणार आहे. यासाठी काही सुचना यमाजी
मालकरांनी केल्या आहेत.
*बत्तीस प्रकारचे
कर रद्द करुन B.T.T. बँक ट्रांझेक्शन टॅक्स कर लागू करा. (स्थानिक स्वराज्य संस्था स्वायत्त
होतील)
*शंभर, पाचशे, हजारच्या नोटा बंद काराव्यात. ( काळ्या पैशाला आळा बसेल)
*पाच हजारापर्यंत्चे
सर्व व्यवहार रोखी करता येईल. (कर चुकवेगिरी होणार नाही)
*50 रु
वरील अप्रत्यक्ष कर कमी करावा. ( सामान्याचे हाल होणार नाहीत)
ही प्रक्रिया
राबविण्यासाठी अर्थक्रांतीचं खासगी विधेयक तयार करण्यात आलं आहे. लवकरच ते
मांडण्यात येईल. तसेच भावी करप्रणाली राबविताना चाणक्यांनी सांगीतलेल्या
सुभाषितासारखी फ़ुलावरील परागकण फ़ुलपाखरु वेचतो,
फ़ुलालाही कळत नाही आणि फ़ुलपाखरालाही त्रास होणार नाही अशी
करप्रणाली अस्तित्वात आणावयास हवी. असेही ते म्हणाले.
कलिम
अजीम

वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
राजा ढाले यांच्या लेखनीतून : घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या अजस्त्र पण सुस्त मुंबईत काही घटना, घडामोडी घडताहेत. खरं म्हणजे मुंबईची घडी-मोड ह...
अपनी बात

- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com