वयात येण्याचे
वय कमी झाले आहे आणि लग्न उशीरा होण्याचे प्रमाण वाढले आहे, यामधल्या काळात खूप मोठी दरी निर्माण होते या काळात तरूणाईने
काय करायचे, यामुळॆ गुंतागुंत वाढली आहे. लैंगिक भावना चाळवणार्या अनेक घटना जवळपास घडत असतात. यात स्वत:ला
सावरणे खूप कठीण आहे, त्यामुळे लग्नापुर्वी मुलींनी सेक्सचा
आनंद घेतल्यास काहीच वाईट नाही. असे
विचार जेष्ठ साहित्यीका विद्या बाळ यांनी मांडले.
कुसूमाग्रज
सृजन कट्टा आणि अक्ष्ररधारा बुक गेलरी यांच्या सयुक्त विद्यामाने 'प्रेमाचे पैलू' या
विषयावर व्याख्यान आयोजीत करण्यात आले होते त्यानिमीत्त त्या बोलत होत्या. सोबत समलैगिंकता व तृतीयपंथीयासाठी काम करणारे जमीर कांबळे
होते.
प्रेम या असीम आनंदात वारताना अवघं आकाश कवेत घ्यावसे वाटते, प्रेम ही समर्पणाची भावना आहे, प्रेमात मनासोबत शरीरही जुळत जातात. या असीम आनंदात वारताना मुला- मुलींनी सेक्सचा आनंद घ्यावा. पण आपण काय करतो आहे याची काळजी असायला हवी. तसेच परिणामाची चिंतादेखील असायला हवी. विशेषत: मुलींना
याकाळात पडणारे प्रश्न. पोगंड
अवस्थेत असताना मन आणि शरीर बदलत असतात. या
अवस्थेत असताना अनेक प्रश्न पडत असतात. याची
उत्तरे पालकांनी न दिल्याने इतरत्र शोध घ्यावा लागतो. याकाळात संबध घडून येतात, मुलींनी या संबधाचा अनुभव घ्यावा कारण भविष्यकाळात जीवनसाथी
निवडताना या संबधामुळे परिपक्वता आलेली असते. तसेच यावयात पडणार्या प्रश्नांची उत्तरे पालकांनी द्यावीत. सेक्सचा विषयावर मोकळेपणाने बोलावे. बलात्काराबद्द्ल बोलताना त्या म्हणाल्या बलात्कार हा
इतर अपघातसारखाच अपघात आहे, करणारा
सुटतो, पण घडणारा भोगतो. यामध्ये 'ती' भ्रष्ट होण्याचे कारणच नाही. यात समाजाने आपले नियम लावू नयेत.
जमीर कांबळे या विषयावर बोलताना म्हणाले की, प्रेम आणि लैगिंक सुख यातआपण खूप मोठी गफ़लत करतो आहे, अज्ञानामुळे या
घटना घडतात, असे म्हणता येणार नाही. अज्ञान असावेच त्यामुळे प्रेम भावना काळायला मदत होते. समोरचा तुम्हास काही देतो तर त्याची सुध्दा तुमच्याकडे काही
अपेक्षा असते. त्यामुळेच प्रेमाला व्यावहारिकतेची व्याख्या दिली आहे. मुलींनी लग्नापुर्वी लैगिंक सुखाचा आनंद घ्यावा त्यामुळे 'दोहो'कडील फ़्रस्ट्रेशन काही प्रमाणात कमी होईल. समलैगिंकतेमधून घडणार्या संबधामधून इनपूट काय या प्रश्नांचे
उत्तर देतांना ते म्हणाले की ज्यावेळेस दोन तरूण-तरूणी सेक्सचा आनंद घेतात त्यात ते क्षणीकसुध्दा
प्रजोत्पादनाचा विचार करत नाही, त्यांना
फ़क्त असीम आनंद हवा असतो. प्रजजन तर 'साईड
इफ़ेक्ट' आहे.
यावेळी
बंक व सुंबरान मासिकाचे संपादक प्रथमेश पाटील व कुणाल गायकवाड आणि अक्षरधाराचे
संस्थापक लक्ष्मण राठवीडेकर व कुसूमाग्रज सृजन
कट्ट्याचे विश्वस्त उपस्थीत होते, कार्यक्रमाचे
निवेदन मनश्री पाठक तर आभार सुनिल दुधे यांनी मानले
कलिम अजीम, पुणे
वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
राजा ढाले यांच्या लेखनीतून : घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या अजस्त्र पण सुस्त मुंबईत काही घटना, घडामोडी घडताहेत. खरं म्हणजे मुंबईची घडी-मोड ह...
अपनी बात

- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com