मागच्या शनिवारी
औरंगाबादहून अंबाजोगाईला येण्यासाठी सिडको बसस्थानकातून बसमध्ये चढलो. बस
अंबाजोगाईमार्गे निघण्यास अवधी होता. एफ.एम.ऐकण्यासाठी कानात हेडफोन टाकला. आर.जे.
धाडधाड शब्दात मनोरंजनासोबत ज्ञानवर्धक माहिती देत होता. सध्या मराठवाड्यात
पडलेल्या दुष्काळाची जाणीव तो वेळोवेळी करून देत होता. पाणी जतन करण्याचे उपाय तो
सांगत होता. मी ऐकण्यात मग्न होतो. ‘तेरे नैना बडे दगाबाज रे...!’
या गाण्यामुळे माझ्या चिंतनात विघ्न आले. मी चॅनल बदलले तिकडेही ‘सांस मे तेरी सांस मिले तो मुझे चैन आए.’ मी
एफ.एम.ची सांस बंद केली.
गळ्यात बॅग हातात
पाण्याची बाटली घेवून एक गृहस्थ माझ्या बाजूला येवून स्थानापन्न झाले. बसताच
त्यांनी नव्या बाटलीचे सील तोडून अर्धी बाटली घशात घातली, मग
गळ्यातील बॅग वरती टाकली. घाम पुसत उरलेली बाटली संपवून बाहेर टाकून दिली.
कर्रर्रर्र आवाज करत बाटली चेमटली. त्यावरून अवजड टायर गेले होते. अशा चेमटलेल्या
बाटल्या स्थानकावर जिथे-तिथे दिसत होत्या.
थोडसं जिवंत झाल्यावर
सहप्रवासी या नात्याने मी त्यांच्याशी बोलू लागलो. त्यांना बीडपर्यंत जायचे होते.
आपणास कोठे जायचे त्यांनी मला प्रश्न विचारला, मी म्हणालो अंबाजोगाईला.
म्हणजे बीडपर्यंत सोबती. बीडला आपण काय करता? पुढचा प्रश्न
मी टाकला. मी बीडला प्राध्यापक आहे. बोलणे मध्येच थांबवत त्यांनी पाणी वाल्याकडून
नवीन बाटली घेत माझ्यापुढे केली. आपण घेणार का? मी धन्यवाद
सोबत ‘नाही’ असे उत्तर दिले. त्या
पाणीवाल्याकडून बसमध्ये पाच-सात बाटल्या खरेदी केल्या गेल्या. बाहेरसुद्धा
पाणीवाले कल्ला करत होते.
या पूर्ण
घटनाक्रमांवर नजर टाकल्यास फार मोठा प्रश्न पडतो की किती सहजतेने आपण पाणी विकत
घेवून पितो. एका लिटरसाठी दहा ते बारा रुपये आपण सर्रास उडवतो. बाटलीतलं पाणी आपण
पितो, पण रिकामी बाटली बाहेर टाकून पर्यावरणाचे किती नुकसान आपण करतो. याबाबतीत
कोणी विचार केला आहे का? आपण प्रवासाला निघताना एक लिटर पाणी
सोबत घेवून का निघू शकत नाही. हाताळायला देखील सहज सोपी असलेली ही बाटली बॅगमध्ये
सुद्धा कमी जागेत मावेल. म्हणतात ना, ‘इच्छा तिथं मार्ग.’
कोणत्याही कामाची इच्छा असेल तर मार्ग सुकर होतो. पण आपल्या
बिघडलेल्या मनोवृत्तीचं काय? यामुळे भविष्यात किती विदारक
अवस्था निर्माण होईल. याचा आपणास अंदाज आहे का?एका बसमध्ये
साधारणतः 50 प्रवासी असतात. प्रत्येकाकडे किमान एखादी बाटली
असतेच. या 50 बाटल्या बसमधून बाहेर टाकल्या जातात. अशा
प्रकारे एका बसस्थानकातून दररोज किमान 60 बसेस धावत असतील.
अर्थात एका बसस्थानकातून दररोज 3,000 बाटल्याचा कचरा उत्पन्न
होतो. महिनाभरात 90,000 प्लास्टीकच्या बाटल्या कचरा स्वरूपात
बाहेर निघतात. यापेक्षा पाणी पाऊचची संख्या असंख्य आहे. याबरोबर रेल्वे स्थानकातून
दररोज हजारो प्लास्टीकच्या बाटल्यांची खरेदी-विक्री केली जाते. चित्रपटगृहे तर अशा
कचर्याचे उगमस्थान असतात.
प्रवासात आपण
प्लास्टीकच्या ग्लासाला चहासाठी सहज स्विकारतो. बिस्कीटे किंवा अन्य खाद्यजन्य
वस्तुंचे रॅपर्स आपण सहजतेने बस व रेल्वे स्थानकात, सार्वजनिक स्थळी
सर्रास टाकतो. दररोज निघणारा हा कचरा ‘रिसायकल’ होतो का? याचा आपण कधी विचार केला आहे का? मातीच्या ढिगार्याखाली हा कचरा वर्षानुवर्षे तसाच पडून राहतो. नियमानुसार
अशा बाटल्या किंवा ग्लास दुमडून फेकून द्यावेत याची आपण क्षणीक तसदी घेत नाही. या
टाकलेल्या बाटल्या किंवा ग्लास रेल्वेत पाणी व चहासोबत सर्रास विकले जातात. म्हणजे
या टाकावू वस्तुंचा पुर्नवापर केला जातो. अर्थात आपल्याच आरोग्याशी आपणच खेळत
असतो. किती दयनीय अवस्था आपण स्वतःची करून घेतो.
अवघ्या दहा ते बारा
रुपयांना मिळणार्या या बाटल्या पर्यावरणाच्या र्हासाला कारणीभूत असतात.
वर्षानुवर्षे नष्ट न होणार्या या प्लास्टीकच्या बाटल्या पर्यावरणाच्या वैरी
ठरतात. रेल्वे किंवा बसस्थानकात अशा प्रकारच्या कचर्याचे ढिग असतात. या कचर्यामुळे
निरनिराळ्या समस्या उत्पन्न होतात. मुंबईत 2006 साली पावसाचे महाआतंक याच
कचर्यामुळे निर्माण झाले होते. सतत गटारी चोक-अप होण्याच्या तक्रारी दिवसेंदिवस
वाढत आहेत. भविष्यात कितीतरी अनिष्ठ रुपे आपणास पहावयास मिळतील. वेळीच काळजी घेवून
या समस्यांवर समाधान शोधण्याची गरज निर्माण झाली आहे. अजून किती दिवस आपण अशी
मानसिक वृत्ती घेवून जगणार. पर्यावरणाचे रक्षण करण्यास आपण असमर्थ आहोत का?
पर्यावरण दिन साजरा करून वृत्तपत्रातून त्याच्या बातम्या वाचून
धन्यता मानणार आणि पर्यावरण संवर्धनाच्या गप्पाच मारणार, ही
वृत्ती आपणास बदलायला हवी.
एक बस किंवा रेल्वे
आपल्या निर्धारित स्थानापर्यंत पोहचली असता रिकाम्या रेल्वे किंवा बसमध्ये बाटल्या
पडलेल्या दिसतील. अर्थात यात पाणी असल्यामुळे बाहेर टाकल्या जात नाहीत, एक
लिटर शुद्ध पाणी तयार करण्यासाठी किती लिटर पाणी वाया जाते याचा अंदाज लावता येणार
नाही. आपण पाणी विकत घेतो पण पूर्ण पाणी पितच नाही. क्वचित एखादी बाटली पूर्ण
रिकामी सापडेल. बाकी बाटल्यात अर्ध्याहून जास्त पाणी असतेच. म्हणजे लाखो लिटर पाणी
आपण दररोज वाया घालतो. एकीकडे पूर्ण परिसर पाण्याच्या टंचाईने ग्रस्त आहे आणि आपण
लाखो लिटर शुद्ध पाणी सहज टाकून पाण्याचा किती अपव्यय करतो आहे.
घरातून बाहेर पडताना
एक बाटली पाणी घेवून आपण निघू शकतो. त्याच बाटलीचा पुर्नवापर करून पर्यावरणाचे
रक्षण करण्यात आपण मदत करू शकतो. प्रत्येक वेळी विकतची बाटली घेवून पाणी पिण्याचे
गरज नाही.
कलिम अजीम
लेखक
पुणे विद्यापीठात
पत्रकारितेचे शिक्षण घेत आहेत

वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
राजा ढाले यांच्या लेखनीतून : घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या अजस्त्र पण सुस्त मुंबईत काही घटना, घडामोडी घडताहेत. खरं म्हणजे मुंबईची घडी-मोड ह...
अपनी बात

- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com