इयरएण्ड संकल्पदिन की चुकांची पुनरावृत्ती !

दोन-तीन दिवसांनी अचानक थंडीत वाढ झाली, त्यामुळे जागोजागी शेकोट्या पेटवण्याला उत आला होता. मलाही शेकोटी समोर बसावेसं वाटलं म्हणून मीही पारावर गेलो. नेहमीच्या कट्ट्यावर, पारावर बसणारी मंडळी शेकोटीसमोर बसून चकाट्या मारत होती.

कुणीतरी सेक्सिस्ट विनोद मारल्यानंतर एकच कल्लोळ उडाला होता. मी हसण्याचे कारण विचारत घोळक्यात शिरलो. उत्तरादाखल रम्या म्हणाला, काही नाही रे असच...! बस तू ही आम्ही येणाऱ्या 31 डिसेंबरच्या पार्टीवर चर्चा करत होतो. मागच्या थर्टी फर्स्टची घटना लक्षात आली आणि हसू आलं.

रात्रीचं जेवण आटोपून एक-एक जण जमत होतं. चांगला आठ-दहा जणांचा ग्रुप जमला होता. मी कुतुहलपूर्वक विचारलं, काय घडलं होतं मागच्या 31 डिसेंबरला?” एकानं घटना सांगितली, मला हसूच आवरता आलं नाही. ती घटना अशी –

एकतीस डिसेंबर सेलिब्रेट करावं म्हणून दोन दिवसापूर्वीच योजना तयार केली होती. रात्री 10 वाजेपर्यंत पोरांची जमवाजमव करून चार-पाच गाड्यावरून शेताकडे निघालो. अंधार्‍या रात्रीत 30 मिनिटाचा प्रवास करून रानात पोहोचलो. रस्त्यात हुल्लडबाजी सुरूच होती. उरलीसुरली शेतातही केली. गोठा टापटीप करून सगळ्यांना बसण्यासाठी बोलावलं. हातातील सिगारेटीचं थोटकं टाकत पोरांनी पटापट जागा अडवली. एक जण म्हणाला आणा रे तो बॉक्स...

मोहसीन म्हणाला, बॉक्स शब्द ऐकताच सगळेच प्रश्‍नचिन्हाचा चेहरा करून ऐकमेकाकडे पाहू लागले. सगळेच चिडीचुप. येताना सिगारेटीसाठी चौकाच्या टपरीवर गाडी थांबवताना बॉक्स खाली ठेवला होता. सिगारेटी घेन धूम स्टाईलमध्ये गाड्या पळवत सगळेच आले होते. चूक लक्षात येताच सगळेच एकमेकांवर दोषारोप करत होते. शिव्या देत होते. मारामारी करत होते. अशातच नवीन वर्षाची चाहूल लागली. शिव्या व मारामारी आणखीन वाढली.’’

विनोदाचा भाग सोडला तर सगळीकडे नवीन वर्षाच्या स्वागतासाठी हीच परिस्थिती असते. अलीकडे टीवी व सिनेमामुळे नववर्ष सेलिब्रेट करण्याचं खुळ गावातही पोहोचलंय. काहीजण याला चंगळवाद म्हणतात, पण गावात किंवा लहान शहरात गेट टू गेदर साजरा करण्यास काहितरी निमित्त नाही लागत. रोजच काहितरी असतंच. नसलं तर गावाबाहेर जाऊन अशाच बैठका रंगतात.

महानगरात तर डिस्को, पब, डान्सबार सेलिब्रेट करम्याची अनेक साधने. पण गाव अजूनही संथ गतीने पारंपरिक रंगात. शहरात मोठमोठे हॉटेल्समध्ये सेलिब्रेट समारंभ चंगळवादी थाट. बड्या घरची मुलं शिकायला आलेली. अशांनी शहरात पैशाचा महापूर आणला. त्यांनी आजादीच्या नावेनं अमली पदार्थाचं अडिक्शन कवटाळलेलं असतं.

कर्णकर्कश संगीत-वाद्य वाजवून मद्य व अमली पदार्थाचे सेवन करून संगीताच्या तालावर बेधूंद नाचलं जातं. नशा करण्याच्या अजब-गजब तऱ्हा! शहरात गच्चीवर, फ्लॅटमध्ये, चौकाचौकात इव्हेंट साजरे होतात. काहीजण कंपन्यांना कंत्राटं देतात. कंपन्या घरात येऊन सर्व सोय करून देतात.

ऑर्केस्ट्रा संगीत सभाचे स्वरूपदेखील मद्यमय असते. मोठमोठ्या हॉटेलमध्ये नट-नट्यांना कोट्यवधी रुपये देऊन बोटावर नाचवण्यात येतं. काही मिनिटासाठी करोडों उडवले जातात. अशाच एका प्रकारात मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री पेचप्रसंगात अडकल्याचं वृत्त वर्तमानपत्रात नुकतंच वाचलं. लहान शहरात नववर्षाचे स्वागत यातूनच जरा वेगळ्या पद्धतीने होते.

नववर्षाच्या जय्यत तयारीची योजना ऐकून मी रम्याला विचारलं. बकाबका दारू ढोसून नववर्ष साजरा करण्याची ही कुठली रे पद्धत? हा दिवस तर नव्या संकल्पाचा असतो न रे!”

सरल्या वर्षांनी सगळी वाट लावून लावली. प्रचंड महागाईतून निर्माण झालेले वैयक्तिक ताणतणाव, कर्जदाराच्या वाढत्या मागण्या, घरातील आंतरकलह या सर्वांचा वैताग म्हणून दारू ढोसली जाते. क्षीण-मळभ दूर करण्याची हजारों कारणे देऊन शेवटच्या दिवशी मद्य सेलिब्रेटकरून सरत्या वर्षाला टाटा केला जातो.

बर, हा साजरायोगकिती वाजेपर्यंत चालतो?” माझा प्रश्‍न. पहाटे तीन-चार वाजेपर्यंत”, मोहसीन उत्तरला. मी म्हणालो, म्हणजे नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी दारू पिऊन, वर्ष कसे सुखाचे जाईल? हा फाजिल आशावाद नव्हे का?”

बऱ्याच वेळाने गप्प असलेला पक्या (प्रकाश) बोलला, अरे असं काही नसतं रे.. नव्या वर्षी दारू ढोसली की वर्षभर चंगळ असते रे... पहिल्या दिवशी दारूनं सुरुवात झाली की वर्षभर वांदा नाही.

हे ऐकताच मी म्हणालो, बरं ते ठिक आहे. मागच्या आठवड्यातही बैठक बसली होती. त्यादिवशी असं काही नव्हतं. मला अठवतं... गेल्या महिन्यात तीन-चारदा बसले होते, वाटतं तुम्ही!” पक्या प्रश्‍नांकीत झाला.

आपल्या वैयक्तिक अपयशाचे खापर सरत्या वर्षावर फोडायची ही कोणती रीत! वैयक्तिक ताणतणाव सगळ्यांनाच असतात, म्हणून का सगळ्यांनी हीच पद्धत अवलंबवायची. आज सगळेच क्षणिक सुखातून निपजलेल्या भौतिकवादाकडे ओढले जात आहेत. टाइम पास, चैन, मजा, मौज इत्यादी घटकांनी आय़ुष्यातील मोठी जागा व्यापून टाकली.

महागडे मोबाईल, चैनीच्या वस्तू, बाईक्स यात तरुणाई गुंग झाली आहे. मोबाईल संवादापेक्षा इतर निर्रथक कामासाठी जास्त वापरला जाऊ लागला आहे. कामा व्यतिरिक्त गाड्या सुसाट धूर उडवत पळत असतात. कट्टे, बाजार, मंदिराचे प्रवेशद्वार, टपऱ्या उचलेगिरींचे अड्डे वाटतात.

उच्च राहणीमान, गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड म्हणजे आज स्टेट्स (प्रतिष्ठा) बनली आहे. रात्री जागरण करून नाईट बॅलन्सचा धुव्वा उडवला जात आहे. ई-व्यसनात तरुणाई अतिरिक्त गुरफटली आहे. सोशल नेटवर्किंग व्यतिरिक्त अवांछित (बहुतेकवेळा पॉर्न)  संकेतस्थळाचा रात्रं-दिवस सर्चसुरू असतो. परिणामी काम न करण्याची वृत्ती, नैराश्य, कंटाळा व क्रियाशक्ती कमी होऊन शॉर्टकट वृत्ती बळावत आहे. हे सगळे प्रकार वर्षभर सुरू असतात.

या सर्वांचा परिणाम अदृष्य स्वरूपात झालेला असतो. परिणामी त्याला शिक्षा भोगावी लागते. या सर्वांचे खापर नव्या सालावर फोडून वर्षाच्या सरत्या दिवशी केलेल्या चुकांवर पडदा टाकला जातो. अर्थात ही स्वतची केलेली फसवणूक का म्हणू नये! नवीन वर्षाच्या त्या रात्री पुन्हा त्याच चुकांनी सुरुवात केली जाते.

31 डिसेंबर म्हणजे संकल्प करण्याचा दिवस. वाईट प्रवृत्तींना आळा घालण्यासाठीचा दिवस आहे. चांगल्या सवयी जोपासण्याचा संकल्प केला पाहिजे. केवळ नवीन कॅलेंडर आणून भिंतीवर लावण्याचा किंवा रोजनिशी डायरी बदलण्यापुरताच हा उपक्रम नसतो.

आजच्या तरुणाईपुढे कितीतरी समस्या आ वासून उभ्या आहेत. शिक्षणातील स्पर्धा, बेरोजगारी, नोकऱ्यांची कमतरता, भ्रष्टाचार, शिक्षणाचे बाजारीकरण भस्मासुरासारखे पुढे येत आहेत. अशा भयानक समस्या पुढे असताना त्या कथितजल्लोषात तरुण मग्न का आहेत?

चला, या निमित्ताने आपण वर्षभर पाळला जाणारा एक संकल्प करुया, चांगले छंद जोपासण्याचा, पर्यावरण संवर्धनाचा, जलसंवर्धनाचा, वीज बचतीचा संकल्प. कुटुंबाशी संवाद साधण्याचा, नातेसंबधातील कटुता दूर करण्याचा, आरोगद्य सभाळण्याचा, नवे मित्र जोडण्याचा, गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्याचा संकल्प करूया.

भ्रष्टाचाराला खतपाणी न घालण्याचा संकल्प, वाईट व्यसनांना आळा घालण्याचा संकल्प. चला मित्रांनो ! एकतीस डिसेंबर हा संकल्पदिन म्हणून साजरा करुया. नवीन वर्षात स्वतःमध्ये बदल करून, त्या बदलांनी आजुबाजूच्या परिसराला उजळवून टाकूया.

(सदर लेख ३० डिसेंबर रोजी अंबाजोगाईहून प्रकाशित होणाऱ्या विवेक सिंधू दैनिकात प्रकाशित झालेला आहे)

वाचनीय

Name

अनुवाद,2,इतिहास,49,इस्लाम,38,किताब,24,जगभर,129,पत्रव्यवहार,4,राजनीति,297,व्यक्ती,21,संकलन,61,समाज,258,साहित्य,77,सिनेमा,22,हिंदी,53,
ltr
item
नजरिया: इयरएण्ड संकल्पदिन की चुकांची पुनरावृत्ती !
इयरएण्ड संकल्पदिन की चुकांची पुनरावृत्ती !
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEh3Omg3npn8dMdJA9W3m1Fe-jhlqYbVUqKEUi105iGQLHPBhcx4f1ggt5FbhYnnpdiAP051KoNjF5TLCihNNIXFZbw8A2XywuMph1GRGZQ2WJo4htkIKFNUnYgCg9k8MrxCeUSZvGdZObHB/w640-h450/377882.gif
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEh3Omg3npn8dMdJA9W3m1Fe-jhlqYbVUqKEUi105iGQLHPBhcx4f1ggt5FbhYnnpdiAP051KoNjF5TLCihNNIXFZbw8A2XywuMph1GRGZQ2WJo4htkIKFNUnYgCg9k8MrxCeUSZvGdZObHB/s72-w640-c-h450/377882.gif
नजरिया
https://kalimajeem.blogspot.com/2012/12/31.html
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/
https://kalimajeem.blogspot.com/2012/12/31.html
true
3890844573815864529
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content