बायपासला पोहचलो त्यावेळेस तो मित्र आधीच येऊन बसला होता. गळाभेट, हस्तांदोलन सोपस्कार पार पडल्यानंतर आम्ही दुभाजकावर बसलो. तब्येत बरी
नसल्याचे त्याच्या चेहर्यावरुन दिसत होते. मागच्याच
आठवड्यात त्याने मुलगी झाली असल्याची खबरबात दिली होती, त्याची
तर चिंता नसेन या विचारात मी होतो. मी काळजीने विचारपुस केली.
" का रे.... तब्येत बरी नाही वाटतं....?"
" नाही रे तसं काही नाही...!" तो म्हणाला .
"मग इतका उदास का दिसतो..? "
मझ्या या प्रश्नाने
तो जास्तच खुलला व मोकळेपणाने बोलू लागला...
त्याच्या बोलण्याने
पुढील माहिती समोर आली. ती अशी,
वहिणीला
डिलीव्हरीसाठी दवाखान्यात न्यायचे म्हणून तो रिक्षा आणण्यास बाहेर
गेला इतक्या वेळात घरातच डिलीव्हरी झाली. बाळ व बाळंतीण दोघेही ठणठणीत होते. तरी
त्याने दोघांना दवाखान्यात नेले. डाक्टरांनी तपासुन अॅडमीट केलं, आठवड्यानंतर रु.
१०,००० चे बील करुन सुट्टी दिली. तो साधा सिलींग कामगार कसेबसे त्याने पैसे भरले. व वहिणीला घेऊन घरी आला. व
अद्यापही त्या पैश्याची परतफ़ेड करतोय.
पोखरी नाका ते प्रशांत नगर या रस्त्यावर बर्याच इमारतीचे नुतनीकरण झाले आहे. काहीचे जिल्हाधिकारीच्या आदेशाचे उल्लंघन करुन बांधकाम सुरु आहेत. बरेच नवीन दवाखाने येथे सुरु झाले आहेत. तर काही ठिकाणावर स्थलांतराचे बोर्ड झळकत आहेत. पिपल्स बँकेपासून ते पोखरी नाक्यापर्यंत २००६ साली एकूण ५० दवाखाण्याची गणना मी केली होती. आज याची संख्या दुपटीने वाढली आहे. एकेकाळी येथे सगळेच लहान मोठे व्यवसाय गुण्यागोवींदाने येथे चालत होती. दवाखाण्याइतकेच इलेक्ट्रानिक मार्केटसाठी हे ठिकाण प्रसिद्ध होते. पण २००६ नंतर परिस्थीती पुर्णपणे बदलली. मालकाला डॉक्टरांनी अव्वाच्या सव्वा रकमा डिपाझीट देऊन दुकानं आपल्या ताब्यात घेतली, व येथे पॅथालजी लॅबपासून ते हॉस्पीटल रिसर्च सेंटर्स, सुरु केलं. आज या ठिकाणी शहरातील मोठे (इमारतीतही) दवाखाने आहेत. यांच्या भव्यदिव्य इमारतीसमोरुन केवीलवाणे चेहरे घेऊन पेशंट येरझार्या घालत असतात. हातात कागदं घेऊन लॅबमध्ये रक्त, लघवी, थुंकी तपासणीसाठी रांगा लावतात. काही लॅबमध्ये बसण्याची सुध्दा सुविधा नाहीत, पेशंट कसाबसा उभा राहुनच आपल्या येणार्या भविष्याबद्दल काळजी करत असतो.

वर्षाला इथले डाक्टर
बदलत असतात,
जागा तीच पण दवाखाने नवीन असे स्वरुप या ठिकाणी आहे. वर्षातच इथला
डॉक्टर आपल्या नवीन वास्तुत स्थलांतर करतो. व त्या जागी नवीन डॉक्टर आपले भविष्य
बदलण्यासाठी येतो. यामुळेच या परिसरातील जागेला सोन्याचे भाव आले आहेत.
अशा प्रकारे एकेका गाळ्यातून पाच पाच दवाखाने स्थलांतरीत होऊन गेले
आहेत. याची ग्वाही प्रशांतनगर परिसरातील प्रत्येक इमारत देते. भविष्यात या परिसरात डॉक्टर व डॉक्टरकीला अनुसरुनच व्यवसाय दिसतील. इतर
व्यवसाय या परिसरातून नामशेष होतील. येथील लहान मोठ्या व्यवसायीकावर गाळेधारकांनी
सक्तीची भाढेवाढ केली आहे. भाढेवाढ द्या अन्यथा दुकाने रिकामे करा, अशी समज देखील दिली आहे. यामुळे येथील लहान
मोठ्या व्यवासायावर संकटं आली आहेत.
येथील बरेचशे डाक्टर सकाळी आठ ते बारा शासकीय दवाखाण्यात (S.R.T.H.) असतात. (म्हणजे सरकारी सेवेत) याचेंच लहान मोठे खाजगी दवाखाने या परिसरात आहेत. मराठवाड्यातील सर्वात मोठ्या शासकीय दवाखान्यापैकी हा एक आहे. आशिया खंडातील सर्वात मोठा "ग्रामीण शासकीय दवाखाना" अशी ऎतिहासीक ओळख असताना इथं रुग्णाची तुरळक गर्दी असते. तुम्ही शासकीय रुग्णालयात का जात नाही, अशी विचारणा केल्यास उत्तरे धक्कादायक असतात. सरकारी दवाखाण्यात चांगली वागणुक मिळत नाही , वारंवार रक्त तपासणी, सोनोग्राफ़ी साठी बाहेर पाठवले जाते. ऒषधे इंजेक्शनच्या सुया प्रत्येक वेळी बाहेरचेच मग कशाला जायचे सरकारी दवाखान्यात. खाजगीमध्ये किमान डाक्टर सेवक चांगली वागणुक देतात, तात्काळ सेवा पुरवतात. यासाठी जास्त पैसे मोजावे लागले तर काय हरकत....! अशी त्यांची उत्तरे.

पण
यांना कोण सांगावे की हेच सरकारी दवाखाण्यातील डाक्टर तुम्हाला खाजगी मध्ये जाण्यास भाग पाडतात. सरकारी दवाखान्यात जाणीवपुर्वक तुच्छ वागणुक देऊन पेशंट पळवण्याचे काम डॉक्टर करतात. मशिनी बंद
पाडुन तपासणी साठी बाहेर पाठवतात. ऒषधे आपल्या पोटात
घालतात. म्हणूनच तर खाजगी दवाखाण्याचे पेव मोठ्या प्रमाणात फ़ुटले आहे. ही
परिस्थीती एकट्या अंबाजोगाई शहराची नसून प्रत्येक शहराची बनले आहे. यावर सरकारी नियंत्रण नाही. म्हणूनच सामान्य
रुग्णाची होरपळ सुरु आहे आधीच रोगाने खंगलेला या मानसिक, आर्थिक,
शारिरीक त्रासाने आणखीन जास्त बनत चालला आहे.
या परिस्थीतीला आपणच
जबाबदार आहेत. आपण कायदा हातात घेऊन परिस्थीती बदलवू शकत नाही, पण
रस्त्यावर येऊन परिस्थीती बदलण्यास भाग पाडु शकतो. अशा आरोग्य सेवेवर बहिष्कार
टाकून सरकारी आरोग्य सेवेला बळकट करु शकतो. जागरुक
ग्राहक या नात्याने आरोग्य सेवेची तपासणी करण्याचा
आपला अधिकार आहे. या अधिकारासाठी आपण जागृत कधी होणार. लहान
मोठ्या आजारासाठी सरकारी दवाखानेच गाठावे जेणेकरुन या खिसेकापू व मानकापू
स्पर्धेपासून काही प्रमाणात आपला बचाव होऊ शकेल.
कलिम अजीम

वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
राजा ढाले यांच्या लेखनीतून : घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या अजस्त्र पण सुस्त मुंबईत काही घटना, घडामोडी घडताहेत. खरं म्हणजे मुंबईची घडी-मोड ह...
अपनी बात

- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com