काल ( गुरुवारी )
पूर्ण दिवसात एकही तासिका नव्हती, ग्रंथालय, संगणक लैब,
कैंटीन, कट्ट्यावरच्या गप्पा सगळे झाले,
तरीही वेळ संपला नव्हता. दुपारचे दोन वाजले होते. पलीकडे फुक्कड
गल्लीत जाऊन देशाचा (वैचरिक) उद्धार करावा. या उद्देशाने आम्ही सगळेजण तिथे गेलो
F.C. रोडवरील आमच्या विभागाच्या शेजारील भिंतीला चिटकून 'महाराष्ट्र
सहकारी मुद्रणालय' आहे, या इमारतीच्या दोन नंबर च्या गेटच्या समोर चहा, सिगारेटी, अल्पोहाराच्या बऱ्याच टपऱ्या आहेत. इथं
रात्री दहापर्यंत तुंबळ गर्दी असते. एका दिवसात सुमारे एक ते दिड हजार सिगारेटीचा
धूर इथं केला जातो. संस्था, कॉलेज, ऑफिस
चे २० ते ३० वयोगटातील कर्मचारी इथं २- ६ च्या ग्रुपमध्ये मुला एवढेच मुली असतात.
इथं प्रत्येक जण गंभीर विषयावर चर्चा करतात. तर कोणी निव्वळ टाईमपास.
F.C. रोड
ते डेक्कन जिमखाना या रस्त्यावर वाहतुक तुरळक असते. महाराष्ट्र सहकारी
मुद्रणालयाच्या कठड्यावर बसून आम्ही कितीतरी गम्भीर विषयावर चर्चा केल्या आहेत.
कालचा विषय इयत्ता तिसरीपासून मानसशास्त्र विषय शिकवला जाणार...????? व व्याकरणाची खर्च गरज आहे का...????? या विषयावर
चर्चा घडली.
या शासकीय
निर्णयामुळे शालेय विद्यार्थ्याची पाठ आणखीन झुकणार, आधीच एवढे ओझे आणि
वरून वजनात भर म्हणजे 'त्या ' निरागस
बालकाची पाठ लवकरच मोडणार!!!! खरच तिसरीत शिकणाऱ्या त्या आठते नऊ वयाच्या मुलाचं
मेंदू एवढं परिपक्व आहे का, जो "आम्हाला" अजूनही छळणारा विषय तो समजून घेईन. या विषयात M.A.
करून " सायको " होऊन रस्त्यावर फिरणारे देखील मी पहिले
आहे. तर या लहान मुलांना याचा काय उपयोग.!!! या आधीही शासनाने पहिलीपासून इंग्रजी
'मस्ट' केलं आज किती शालेय मुलांना
इंग्रजीचा गंध सुद्धा लाभला आहे का ?? कितीना केवळ समजण्यापुरते इंग्रजी येते. परिणाम शून्य ...... नंतरच्या काळात शासनाने आठवी पर्यंत
परीक्षाच न घेण्याचा खुळचटवाणा निर्णय घेतला हे दोन निर्णय किती विरोधाभासिक आहेत.
असे निर्णय घेऊन शासनाला काय साध्य करायचय.
व्याकरण हा देखील
शालेय जीवनापासून महाविद्यालय स्तरापर्यंत तसेच कार्यालयीन कामकाजात छळणारा. खरच
गरज आहे का हो या व्याकरणाची. आम्ही पत्रकारितेचे विद्यार्थी आम्हाला ऱ्हस्व
दीर्घ चा नसलेला ताप ... एकजण म्हणाला आम्हाला शाळेत रा. र. बोराडे शिकविला असता
तर इथं ताप आला नसता. एकजण म्हणाला च्याआईला काढून टाका व्याकरणाला. एकजण म्हणाला
प्रमाणभाषा कालबाह्य करावी. तो म्हणतो मते मांडताना प्रमाण भाषेची काय गरज!!!!
प्रमाण भाषेमुळे एखादा बोलणारा घाबरतो व लाजरा बुजरा राहतो. किती गोडवा आहे या
बोली भाषेमध्ये . व्याकरण व प्रमाणभाषेच्या अतिरंजित पण मुळे बोलीभाषा नष्ट
होण्याच्या मार्गावर आहे .
माध्यमात सुद्धा बोली
भाषेचा वापर केला जातो . मग इथेच का प्रमाण भाषेची व व्याकरणाची सक्ती का.?? व्याकरणाची
गरज नाही यावर खूप चर्चा घडल्या सभा संमेलने झाली पण परिणाम शून्य.... !
सुमारे अडीच तास
चर्चा केल्यानंतर टिळक स्मारक मंदिरात पूर्व जनरल व्ही. के. सिंग यांच्या
व्याख्यानाची आठवण झाली. मग आम्ही ती गंभीर चर्चा व सभा बरखास्त केली. पण एक मात्र
नक्की व्याकरण नको यावर सगळ्याजणाचे एकमत झाले.
कलिम अजीम
पुणे विद्यापीठ
वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
राजा ढाले यांच्या लेखनीतून : घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या अजस्त्र पण सुस्त मुंबईत काही घटना, घडामोडी घडताहेत. खरं म्हणजे मुंबईची घडी-मोड ह...
अपनी बात

- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com